गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 08:45 AM2024-10-20T08:45:30+5:302024-10-20T08:56:33+5:30
मृतांमध्ये पाच लहान मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. सर्व मृतदेह शवागृहात ठेवण्यात आले आहेत.
राजस्थानच्या धौलपूरमध्ये स्लीपर कोच बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ मुलांसह ११ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तीन जण गंभीर असून सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मृतांमध्ये पाच लहान मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. सर्व मृतदेह शवागृहात ठेवण्यात आले आहेत. हे सर्व लोक टेम्पोतून प्रवास करत होते. एनएच ११बी वरील सुनीपूर गावाजवळ हा अपघात झाला आहे. सर्व मृत बा़डी शहरातील गुमट मोहल्ल्याचे रहिवासी आहेत. बरौली येथील त्यांच्या नातेवाईकांकडे एका कार्यक्रमाला गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला आहे.
अपघातात बसचेही नुकसान झाले असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. टेम्पोतील प्रवासी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. बसचा वेग खूप होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर हायवेवरून जाणाऱ्या इतर वाहनांतील प्रवाशांनी जखमींना मदत केली, तसेच पोलिसांना माहिती दिली. काही जण गंभीररित्या जखमी होते. परंतू हॉस्पिटलच्या वाटेवर असताना त्यांचा मृत्यू झाला.