ट्र्क-स्कॉर्पियोमध्ये भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 11:22 AM2020-06-05T11:22:54+5:302020-06-05T11:25:44+5:30
स्कॉर्पियोची एका कंटेनर ट्रकला धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यात स्कॉर्पियोचा चेंदामेंदा झाला तसेच आतील नऊ जणांचा मृत्यू झाला.
प्रतापगड (उत्तर प्रदेश) - मुसळधार पावसादरम्यान, आज पहाटे ट्रक आणि स्कॉर्पियो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. हा अपघातउत्तर प्रदेशधील प्रतापगड जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चार पुरुष, तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त स्कॉ्र्पियोमधील प्रवासी हे बिहारमधील भोजपूर येथून राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. दरम्यान, नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या स्कॉर्पियोची एका कंटेनर ट्रकला धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यात स्कॉर्पियोचा चेंदामेंदा झाला तसेच आतील नऊ जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, चेंदामेंदा झालेल्या चारचाकीमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस करटचा वापर करावा लागला. या स्कॉर्पियोचा ड्रायव्हर अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Pratapgarh: 9 dead and one injured after the car they were travelling in collided with a truck in Nawabganj police station limit. SP says,"the victims were on their way to Bhojpur in Bihar from Rajasthan to attend an event. The injured has been shifted to hospital." pic.twitter.com/Xp5RnUzXHq
— ANI UP (@ANINewsUP) June 5, 2020
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.