कारमधून रिल्स बनवण्याच्या नादात भीषण अपघात, भजन गायिकेसह २ महिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 12:41 PM2023-05-30T12:41:20+5:302023-05-30T12:43:25+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, अंजू, शशी आणि त्यांची आणखी एक सहकारी महिला सेक्टर ६ येथील साई मंदिरात आरतीसाठी गेल्या होत्या.

Horrific accident while making reels from car, 2 women including bhajan singer die | कारमधून रिल्स बनवण्याच्या नादात भीषण अपघात, भजन गायिकेसह २ महिलांचा मृत्यू

कारमधून रिल्स बनवण्याच्या नादात भीषण अपघात, भजन गायिकेसह २ महिलांचा मृत्यू

googlenewsNext

हरयाणा - राज्याच्या करनाल जिल्ह्यातील सेक्टर ६ ग्रीन बेल्ट येथे फिरण्यास गेलेल्या ३ महिलांपैकी दोघींचा कारअपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कारने धडक दिल्याने अपघातातमहिला जागीच ठार झाली, दुसऱ्या महिलेनं रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. तर, तिसरी महिला या अपघातात किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृत महिलांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी करनालच्या मर्चरी हाऊस येथे ठेवण्यात आले आहेत. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजू, शशी आणि त्यांची आणखी एक सहकारी महिला सेक्टर ६ येथील साई मंदिरात आरतीसाठी गेल्या होत्या. आरतीनंतर या महिला जवळ फिरण्यासाठी जात असताना जोराच्या वेगात आलेल्या कारने या तिन्ही महिलांना उडवले. त्यामध्ये, अंजू आणि शशी यांचा मृत्यू झाला असून एक महिला किरकोळ जखमी आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांचा रोष पाहताच कारचालकाने गाडी तिथेच सोडून धूम ठोकली. कारमध्ये काहीजण मोबाईल रिल्स बनवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. 

दरम्यान, या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, गंभीर जखमी महिलांना कल्पना चावला मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जेथे डॉक्टरांनी अंजू साई यांना मृत घोषित केले, तर शशी यांनीही उपचारादरम्यान जीव सोडला. या तिन्ही महिला दररोज मंदिर जात होत्या. त्यापैकी मृत्यु झालेल्या अंजू या भजन गायिका होत्या, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या घटनेनंतर करनाल शहरावर शोककळा पसरली आहे.  
 

 

Web Title: Horrific accident while making reels from car, 2 women including bhajan singer die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.