आग्रा-लखनौ एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात; बस-डीसीएमची जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू, 21 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:49 AM2022-12-14T11:49:59+5:302022-12-14T11:58:39+5:30
बसमध्ये जवळपास 50 प्रवासी बसले होते. एक्स्प्रेसवेवर 61 किलोमीटरवर पोहोचल्यावर बस डीसीएमला धडकली आणि रेलिंग तोडून खाली पडली.
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. एक खासगी बस आणि डीसीएमची जोरदार धडक झाली. यामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तसेच 21 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा लखनौ एक्स्प्रेसवेवर बुधवारी पहाटे 4.30 वाजता नगला खंगार पोलीस स्टेशन परिसरात एक बस लुधियानाहून रायबरेलीकडे जात होती
बसमध्ये जवळपास 50 प्रवासी बसले होते. एक्स्प्रेसवेवर 61 किलोमीटरवर पोहोचल्यावर बस डीसीएमला धडकली आणि रेलिंग तोडून खाली पडली. अपघात होताच प्रवाशांनी मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. आजूबाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी प्रवाशांना वाचवण्यासाठी धावू लागले. त्याची माहिती तत्काळ यूपीडा आणि नगला खंगार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या पथकांनी जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यास सुरुवात केली.
एसपी देहात रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य वेगाने सुरू असून 21 जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. 19 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना दुसऱ्या बसने पाठवले आहे आणि सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांची माहिती घेतली जात आहे.
बस खाली पडताच प्रवाशांचे सामान इकडे तिकडे पडले. प्रवासी जखमी झाल्यानंतरही त्याला आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी होती. पोलीस आल्यानंतर प्रवाशांना सुरक्षित वाटले. बसमधील महिला व लहान मुले जखमी झाल्यानंतर आरडाओरडा झाला. त्यांना प्रथम लोकांनी बाहेर काढले. अपघात झाला तेव्हा बहुतांश प्रवासी झोपेत होते. बस आणि डीसीएमची धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"