पुन्हा वृक्षावर कुर्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2016 12:03 AM2016-02-22T00:03:27+5:302016-02-22T00:03:27+5:30
जळगाव : शहरात वृक्षांची कत्तल थांबत नसून ती वाढतच असल्याचे चित्र आहे. रविवारी नवीपेठेतील एका वृक्षावर पुन्हा कुर्हाड चालली. मात्र वन्य जीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकार्यांनी वेळीच धाव घेऊन ती रोखली. यामध्ये परवानगी ज्या झाडाची आहे त्या जातीचे झाड न तोडता दुसर्याच जातीचे झाड तोडले जात असल्याचे संस्थेच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
Next
ज गाव : शहरात वृक्षांची कत्तल थांबत नसून ती वाढतच असल्याचे चित्र आहे. रविवारी नवीपेठेतील एका वृक्षावर पुन्हा कुर्हाड चालली. मात्र वन्य जीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकार्यांनी वेळीच धाव घेऊन ती रोखली. यामध्ये परवानगी ज्या झाडाची आहे त्या जातीचे झाड न तोडता दुसर्याच जातीचे झाड तोडले जात असल्याचे संस्थेच्या पदाधिकार्यांनी सांगितले. शहरात सध्या वृक्ष तोडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच प्रकार रविवारी नवीपेठेत घडला. येथे एका दुचाकीच्या शोरुम समोर असणार्या झाडाच्या फांद्या तोडण्याची परवानगी मनपाने दिली आहे. येथे या फांद्यासह वरील भागही तोडला जात असल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष वासुदेव वाढे यांना मिळाली. त्यावेळी त्यांनी तेथे धाव घेऊन ही तोड रोखली. त्यावेळी मिळालेली परवानगी पाहिली असता गुलमोहोरच्या झाडाच्या फांद्या तोडण्याची परवानगी आहे, मात्र प्रत्यक्षात येथे सोनमोहेरचे झाड तोडले जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी हा प्रकार रोखला. रविवार असल्याने संबंधित शोरुम मालक तेथे नसल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. मनपाचेही दुर्लक्ष ..ज्या झाडाच्या फांद्या तोडण्याची परवानगी दिली आहे, त्याच झाडाच्या फांद्या तोडल्या जात आहे की, दुसर्या झाडाच्या, याकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. १५ ते २० वर्षाचे व साधारण ५० फूट उंच असलेल्या या झाडाच्या फांद्या तोडताना तेथे मनपाचे अधिकारी अथवा कर्मचारी कोणीच नव्हते. पक्षांचा अधिवास नष्ट...ज्या फांद्या तोडल्या त्यावर बुलबुल या पक्षाचे घरटे होते. तेही काढण्यात आल्याने पक्षांचाही अधिवास नष्ट करण्यात आला.