धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदार पुत्राची महामार्गावर घोडेस्वारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 19:28 IST2020-05-12T18:58:11+5:302020-05-12T19:28:14+5:30
हा व्हिडीओ सोमवारी काढण्यात आला आहे. यानंतर सोशल मिडीयावर लोकांनी कर्नाटक सरकारला धारेवर धरले. तसेच या आमदार पुत्रावर लॉकडाऊन नियम तोडल्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदार पुत्राची महामार्गावर घोडेस्वारी
बेंगळुरू : कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. काही ठिकाणी अत्यावश्यक सेवा, दैनंदिन व्यवहारांसाठी सूटही देण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्या अनेकांना पोलिसांकडून प्रसादही मिळत आहे. असे असताना कर्नाटकमध्येआमदारपुत्राने रस्त्यावरून घोडेस्वारी करत त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.
हा प्रताप गुंडलूपेटचे आमदार निरंजन कुमार यांच्या मुलाने केला आहे. त्याने म्हैसूर उटी राष्ट्रीय महामार्गावरील आयटीआय कॉ़लेजजवळ ही घोडेस्वारी केली आहे. हा व्हिडीओ सोमवारी काढण्यात आला आहे. यानंतर सोशल मिडीयावर लोकांनी कर्नाटक सरकारला धारेवर धरले. तसेच या आमदार पुत्रावर लॉकडाऊन तोडल्याने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याने घोडस्वारी करताना मास्कही घातलेले नाही.
या व्हिडीओ प्रकरणावर आमदार निरंजन कुमार यांनी अजब खुलासा केला आहे.'' हा व्हिडीओ माझ्याच मुलाचा आहे. पण असा कोणताही नियम कागदावर लिहिलेला नाही की घोडेस्वारी करू शकत नाही.'', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मी बेंगळुरुला होतो. आज म्हैसुरमध्ये आलो आहे. मला माहिती नाहीय की काय घडलेय. मी त्याची माहिती घेईन. जर त्याच्याकडून काही चूक झाली असेल तर मी त्याला सांगेन की काय चूक आणि काय बरोबर ते. मी त्याची बाजू घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही ग्रीन झोनमध्ये राहतोय. त्यामुळे सगळेच मास्क घालत नाहीत. परंतू काळजी म्हणून मी मुलासह सर्वांना मास्क घालायला सांगेन असेही ते म्हणाले. दुसरीकडे पोलिसांनीही बचावात्मक पवित्रा घेतला असून आम्ही लॉकडाऊनमध्ये राष्ट्रीय महामार्गावर घोडेस्वारी करणे कायदा तोडण्यामध्ये बसते का याची खातरजमा करत आहोत, असे सांगितले.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus तळीरामांचे फावले! ऑर्डर दिल्यावर राज्यात दारु घरपोच मिळणार
चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण
लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर नाहीत; राज्य सरकारकडून ई-संजीवनीची ओपीडी सुविधा
CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले
गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका