रुग्णांकडून एक रुपया जास्त घेतली फी, भाजप आमदार झाले संतप्त; कर्मचाऱ्याची गेली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 02:28 PM2024-09-18T14:28:15+5:302024-09-18T14:29:24+5:30
हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील जगदौर येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमधील आहे.
उत्तर प्रदेशातील भाजप आमदार प्रेमसागर पटेल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, आमदार प्रेमसागर पटेल हे रुग्णालयाची तपासणी करण्यासाठी अचानक आले असता, तेथे त्यांना एक कंत्राटी कर्मचारी रुग्णांकडून एक रुपया जास्त फी घेत असल्याचे दिसून आले. यानंतर आमदार प्रेमसागर पटेल हे संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. यासंबंधीचा व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये आमदार प्रेमसागर पटेल हे जाब विचारताना दिसत आहे. ते म्हणत आहेत की, जनतेकडून जास्त पैसे घेण्याची तुमची हिम्मत कशी झाली, तुमच्यामुळेच आमच्या लोकांना खासगी रुग्णालयात जावं लागत आहे. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील जगदौर येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमधील आहे. याठिकाणी एक कंत्राटी कर्मचारी रुग्णांकडून एक रुपयाच्या निश्चित शुल्काऐवजी दोन रुपये घेत होता.
ही बाब निदर्शनास येताच कंत्राटी कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. जादा शुल्क आकारण्यात सहभागी असलेल्या कंत्राटी कर्मचारी संजय याला काढून टाकण्यात आले आहे, असे अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी (एसीएमओ) राजेंद्र प्रसाद यांनी सांगितले. दरम्यान, एक रुपयापेक्षा जास्त फी वसूल केल्याचे लक्षात आल्यानंतर आमदार प्रेमसागर पटेल यांनी तात्काळ सीएमओला फोन करून स्लिप काउंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला काढून टाकण्यास सांगितले.
देश को ऐसे नेताओं की सख्त जरूरत है.! 🙏 🫡
— Beerendra Patel (@Beeru3285) September 17, 2024
उत्तर प्रदेश के महाराजगंज ज़िले के सरकारी अस्पताल में BJP विधायक प्रेम सागर पटेल के औचक निरीक्षण में फार्मासिस्ट द्वारा पर्ची के लिए 1 की जगह 2 रुपए लिया जा रहा था। फिर क्या विधायक जी का गुस्सा देखिये, अफ़सरों को जमकर खरी खोटी सुनाई.! pic.twitter.com/KKXOEMBP6N
याचबरोबर, आम्हीही खेड्यातून आले आहोत. गरीबी आणि सहायतेत जगणे काय असते, हे आम्हाला समजते. त्यामुळे काय चालले आहे, ते तुम्ही मला समजावून सांगण्याची गरज नाही. मला माहित आहे. ही लूटमार आहे. जनतेला त्रास देऊ नका, असे म्हणत सीएचसी कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त करताना आमदार प्रेमसागर पटेल व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तसेच, सरकारी आरोग्य सुविधेतील अनियमिततेबद्दल लोकांकडून तक्रारी आल्या होत्या, असे आमदार प्रेमसागर पटेल यांनी म्हटले आहे.