भयंकर! मृत व्यक्तीवर उपचार करत होतं रुग्णालय; तब्बल 14 लाखांचं बिल, कुटुंबाचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 08:21 AM2022-12-18T08:21:50+5:302022-12-18T08:31:03+5:30
रुग्णालयात दाखल असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही रुग्णालयाने मृतदेहावर उपचार करुन लाखो रुपयांचं बिल दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
हरियाणाच्या सोनीपतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रुग्णालयावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतरही रुग्णालयाने मृतदेहावर उपचार करुन लाखो रुपयांचं बिल दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि नातेवाईकांवर अनेक आरोप केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाचा मृत्यू झाला होता पण डॉक्टरांनी जाणूनबुजून त्याच्यावर उपचार केले आणि लाखो रुपयांचं बिल केलं. तसेच ड़ॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप देखील करण्यात आला आहे. मृताच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर रुग्णालयात येऊन खूप गोंधळ घातला. सोनीपतच्या राई गावात राहणाऱ्या धर्मवीर यांना कुटुंबाने हाय बीपीचा त्रास असल्याने 10 दिवसांआधी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी नातेवाईकांना तेव्हा धर्मवीर यांच्या उपचारासाठी चार लाख जमा करा असं सांगितलं. तसेच ऑपरेशन झाल्यावर ते बरे होतील असंही म्हटलं. मात्र उपचारादरम्यान कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना धर्मवीर यांना भेटून दिलं नाही. कुटुंबीयांना शंका आली तेव्हा त्यांनी आम्ही रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलवतो असं सांगितलं. त्याच वेळी नेमकं डॉक्टरांनी तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे असं सांगितलं.
धर्मवीर यांचा मृत्यू झाल्यानंतर गावकरी आणि नातेवाईक रुग्णालयाजवळ मोठ्या संख्येने जमले. त्यांनी गोंधळ घातला. या घटनेची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली. रुग्णाचा आधीच मृत्यू झाला होता. पण यांनी सांगितलं नाही. दहा दिवसांचं 14 लाख बिल दिलं आहे. एक गरीब कुटुंब एवढे पैसे कुठून आणणार असा सवाल देखील कुटुंबाने विचारला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"