Video - अश्लील गोष्टी दाखवून विनयभंग करायचा; विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकाची केली यथेच्छ धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 05:13 PM2022-12-16T17:13:42+5:302022-12-16T17:16:48+5:30
एका मुख्याध्यापकाने शाळेतील हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कर्नाटकमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका मुख्याध्यापकाने शाळेतील हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्नाटकच्या श्रीरंगपटना येथील कटेरी सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. या घटनेनंतर मुख्याध्यापकावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
मांड्या जिल्ह्यातील पांडवपुरा तालुक्यातील कटेरी गावात असलेल्या शाळेत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप मुख्याध्यापकावर करण्यात आला आहे. हे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर विद्यार्थिनींनी मिळून मुख्याध्यापकाला लाठ्या-काठ्यांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, कटेरी गावातील शाळेत एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली.
#mandya A senior teacher of a govt school in Kattigeri beaten up by students before handing him over to police.There were several complaints of sexual misconduct against Chinmayanand.Yesterday,students got together & hit him with sticks for harassing a girl student #Karnatakapic.twitter.com/ud2WSMCkLx
— Imran Khan (@KeypadGuerilla) December 15, 2022
विद्यार्थिनींनी या घटनेनंतर मुख्याध्यापकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. मुलींनी झाडू आणि काठ्यांनी मुख्याध्यापकाची यथेच्छ धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलींसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप मुख्याध्यापकावर करण्यात आला आहेत. या गंभीर प्रकरणाबाबत माहिती मिळताच मुख्याध्यापकाला विद्यार्थिनींच्या ग्रुपने चोप दिला.
विद्यार्थिनीने मुख्याध्यापकाने त्याच्या रुममध्ये बोलावलं आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला आहे. या प्रकरणाबाबत कोणालाही सांगितलं, तर त्या विद्यार्थ्यांच्या ट्रान्सफर सर्टिफिकेटमध्ये त्यांची प्रतिमा मलीन करण्यात येईल, अशी धमकी मुख्याध्यापकाने दिली होती. मुख्याध्यापक मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवायचा, असा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे. हे गंभीर प्रकरण उघडकीस आल्यानंतर मुख्याध्यापकाला लाठ्या काठ्यांनी मारलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"