दगडफेकीमुळे लष्कराच्या तावडीतून निसटला खुँखार दहशतवादी
By admin | Published: May 25, 2017 08:01 PM2017-05-25T20:01:39+5:302017-05-25T20:05:26+5:30
काश्मीर खोऱ्यात फुटीरतावाद्यांकडून होत असलेली दगडफेक लष्करासाठी डोकेदुखी ठरत आहे. लष्कराने शोधमोहिम राबवून घेरलेला खुँखार दहशतवादी
Next
>ऑनलाइन लोकमत
पुलवामा, दि. 25 - काश्मीर खोऱ्यात फुटीरतावाद्यांकडून होत असलेली दगडफेक लष्करासाठी डोकेदुखी ठरत आहे. लष्कराने शोधमोहिम राबवून घेरलेला लष्कर ए तोयबाचा खुँखार दहशतवादी स्थानिकांनी केलेल्या दगडफेकीमुळे तब्बल सहाव्यांदा लष्कराच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी ठरला.
लष्कराने मंगळवारी रात्री जोरदार शोधमोहीम राबवून लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू दुजाना याला घेरले होते. अबू दुजाना हा त्याच्या दोन साथीदारांसह हाकीरपुरा गावात लपून बसल्याची माहिती लष्कराला मंगळवारी संध्याकाळी मिळाली. त्यानंतर लष्कराने परिसरातील चार गावांना घेराव घालत दुजाना याला कोंडीत पकडले. जोरदार शोधमोहीमही सुरू केली. मात्र याच दरम्यान स्थानिकांनी लष्कराच्या जवानांवर जोरदार दगडफेक सुरू केली. त्यामुळे लष्कराच्या तावडीतून पळ काढण्यात दुजाना यशस्वी झाला.
अबू दुजाना हा लष्कर ए तोयबाच्या काश्मीरमधील सर्व दहशतवादी कारवाया पार पाडत असतो. 2015 साली उधमपूर येथे बीएसएफच्या ताफ्यावर झालेला हल्ला, पंपोर येथील दहशतवादी हल्ल्यासह अनेक दहशतवादी कारवायांत सहभागी असलेल्या दुजानावर 35 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, दुजाना हा पाकिस्तानमध्ये पळण्याच्या प्रयत्नात आहे, मात्र पुलवामा येथे झालेल्या चकमकीत त्याच्या डाव्या पायाला गंभीर जखम झाल्याने पुढचे काही दिवस तो काश्मीरमध्येच राहण्याची शक्यता आहे.