एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या
By admin | Published: May 2, 2016 08:34 PM2016-05-02T20:34:32+5:302016-05-02T20:34:32+5:30
जळगाव : निमखेडी शिवारातील चंदूअण्णा नगराच्या शेजारी असणार्या रेणुका पार्क अपार्टमेंटमधील दोन सदनिकांसह विश्रामनगरातील दोन रो-हाऊसेस अशा चार ठिकाणी रविवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्या झाल्या. चोरट्यांनी घरांच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करीत सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरी झालेली चारही ठिकाणे तालुका पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असताना चोरट्यांनी हेतू साध्य केल्याने आर्य व्यक्त केले जात आहे.
Next
ज गाव : निमखेडी शिवारातील चंदूअण्णा नगराच्या शेजारी असणार्या रेणुका पार्क अपार्टमेंटमधील दोन सदनिकांसह विश्रामनगरातील दोन रो-हाऊसेस अशा चार ठिकाणी रविवारी मध्यरात्रीनंतर घरफोड्या झाल्या. चोरट्यांनी घरांच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करीत सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तू असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरी झालेली चारही ठिकाणे तालुका पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असताना चोरट्यांनी हेतू साध्य केल्याने आर्य व्यक्त केले जात आहे.निमखेडी शिवार शहरापासून अंतरावर असल्याने सायंकाळी ७ वाजेनंतर या परिसरात फारशी वर्दळ नसते. घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी आपला डाव साधला आहे. चंदूअण्णा नगराच्या शेजारी असलेल्या रेणुका पार्क अपार्टमेंटमध्ये नरेंद्र दत्तात्रय जाधव (मूळ रा.फुपनगरी, ता.जळगाव) यांच्या सदनिका क्रमांक ८ व नितीन जगन्नाथ पाटील (मूळ रा.लाडली, ता.धरणगाव) यांच्या सदनिका क्रमांक ९ मध्ये चोरी झाली आहे. तसेच याच परिसरात कृषी संशोधन केंद्रासमोर असणार्या विश्रामनगरातील प्लॉट क्रमांक २ मध्ये राहणारे लक्ष्मण नामदेव सपकाळे (मूळ रा.फुपणी, ता.जळगाव) व प्लॉट क्रमांक ९/२ मध्ये डॉ.मुकेश शालिग्राम पाटील (मूळ रा.नांद्रा, ता.जळगाव) यांच्या घरातून चोरट्यांनी दागिने व रोकड लंपास केली आहे. चारही ठिकाणांहून सुमारे ७० ते ७५ हजार रुपयांच्या रोकडसह २० ते २५ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने असा एक लाख रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.रेणुका पार्क अपार्टमेंटमध्ये दोन ठिकाणी चोरीरेणुका पार्क अपार्टमेंटमधील सदनिका क्रमांक ८ मध्ये राहणारे नरेंद्र जाधव हे मूळचे फुपनगरीचे आहेत. प्रिंटींग प्रेसच्या व्यवसायानिमित्त ते जळगावात स्थायिक झाले आहेत. ७ ते ८ महिन्यांपूर्वीच ते रेणुका पार्क अपार्टमेंटमध्ये राहायला आले आहेत. रविवारी ते पत्नीसह त्यांच्या गावी फुपनगरीला गेलेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेली २५ हजार रुपयांची रोकड व २ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. कपाटातील इतर वस्तू, कपडेदेखील त्यांनी अस्ताव्यस्त फेकून दिले. चोरट्यांनी घरात इतरत्र शोधाशोध केली आहे; परंतु सुदैवाने त्यांच्या हाती काही लागले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जाधव दाम्पत्य सोमवारी सकाळी जळगावात दाखल झाले.