10 दिवसांत ट्रेनमध्ये 80 मजूर कसे मृत्युमुखी पडले, मोदी सरकार उत्तर द्या- ओवैसी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 11:25 PM2020-05-30T23:25:18+5:302020-05-30T23:27:03+5:30
ओवैसी यांनी लॉकडाऊन व कामगारांच्या परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
नवी दिल्लीः एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवैसींनी यांनी आज तकचा विशेष कार्यक्रम ई-अजेंडामध्ये भाग घेतला. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. ओवैसी यांनी लॉकडाऊन व कामगारांच्या परिस्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, मोदी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. कोणत्या कारणासाठी सरकार एक वर्ष साजरा करीत आहे?, कोरोना विषाणूमुळे लागू केलेले लॉकडाऊन पूर्णपणे घटनाबाह्य आहे. लॉकडाऊनमुळे देशातील 25 कोटी कामगारांचे नुकसान झाले आहे. सरकार नक्की काय साजरे करीत आहे, असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला. 12 कोटी लोकांनी लॉकडाऊनमुळे नोकरी गमावली. लॉकडाऊनमुळे शेकडो लोकांचे प्राण गेले. लॉकडाऊनमुळे आज देशातील कामगार रस्त्यावर आले आहेत.
असदुद्दीन ओवैसी यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनवरून मोदी सरकारवर हल्ला केला. ते म्हणाले की, श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जर चांगली व्यवस्था केली गेली असती तर 10 दिवसांत ट्रेनमध्ये 80 लोक मृत्युमुखी पडले नसते, असंही ओवैसी म्हणाले आहेत.
हेही वाचा!
Unlock 1: आता प्रवासासाठी ई-पासची गरज नाही; केंद्राने केली घोषणा, राज्याच्या निर्णयाची प्रतीक्षा
Lockdown 5.0 : मुहूर्त ठरला!... पहिल्या टप्प्यात उघडणार धार्मिक स्थळं, मॉल अन् हॉटेल्सचं दार
Lockdown 5.0 : केंद्राची नवीन नियमावली प्रसिद्ध; जाणून घ्या कोणती सूट मिळणार अन् कशावर बंदी