इंधनाचे दर ठरतात कसे? भारताला दररोज लागते ५० लाख बॅरेल्स इंधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 06:46 AM2022-05-24T06:46:36+5:302022-05-24T06:47:08+5:30

मुळात इंधनाच्या किमती ठरतात तरी कशा, जाणून घेऊ या...

How are fuel prices determined? India needs 5 million barrels of fuel per day. | इंधनाचे दर ठरतात कसे? भारताला दररोज लागते ५० लाख बॅरेल्स इंधन

इंधनाचे दर ठरतात कसे? भारताला दररोज लागते ५० लाख बॅरेल्स इंधन

Next

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत भरमसाठ वाढ झाल्याने महागाईचा आगडोंब उसळला होता. महागाईत होरपळत असलेल्या सामान्यांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादनशुल्कात कपात केली. त्यामुळे या दोन्ही इंधनांच्या किमती अनुक्रमे नऊ आणि सात रुपयांनी कमी झाल्या आहेत. मुळात इंधनाच्या किमती ठरतात तरी कशा, जाणून घेऊ या...

n तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडते तेव्हा त्याची मूळ किंमत नक्की केली जाते.
n इंधनाची ही मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते.
n आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेतले जातात.
n शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात.
n या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो.
n या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवली जाते.
n सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल केला जातो.

कच्च्या तेलाच्या आयातीचा करार झाला असेल तर संबंधित देशाकडून तेल आयात केले जाते.

कच्चे तेल घेतल्याच्या दिवसापासून २२व्या दिवशी पेट्रोल पंपांपर्यंत पोहोचते.

म्हणजे १ तारखेला कच्च्या तेलाचा व्यवहार झाला असेल तर प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी २२ दिवस लागतात.

देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्या इंधनाचे दर ठरवतात.

मूळ किंमत    ₹५६.३५
वाहतुकीचा खर्च     ₹०.२०
उत्पादन शुल्क     ₹१९.९०
डीलरचे कमिशन    ₹३.८५
व्हॅट    ₹१५.०५
एकूण किंमत     ₹९५.३५

५० लाख बॅरेल्स इंधन भारताला दररोज लागते.

 

Web Title: How are fuel prices determined? India needs 5 million barrels of fuel per day.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.