हाऊ इज द जॉब्स? तिपटीने घसरली रोजगारनिर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 06:46 AM2019-03-10T06:46:31+5:302019-03-10T06:47:00+5:30
मागील चार वर्षांत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रात केवळ ३,३२,३९४ शुद्ध रोजगारांची निर्मिती झाली आहे.
Next
नवी दिल्ली : मागील चार वर्षांत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रात केवळ ३,३२,३९४ शुद्ध रोजगारांची निर्मिती झाली आहे. सीआयआयने केलेल्या एक लाखापेक्षा अधिक कंपन्यांच्या सर्व्हेतून हे दिसून आले आहे. ही २0१५-१६ पासूनची ही आकडेवारी आहे.
२0१२ ते २0१५ या तीन वर्षांच्या काळात एसएमईमध्ये ११ लाख ५४ हजार २९३ रोजगार निर्माण झाले होते. नव्या रोजगारांतून गमावलेले रोजगार वजा केल्यानंतर शुद्ध रोजगाराचे आकडे येतात. सर्वेक्षणातील ७0,९४१ कंपन्यांत रोजगारांत वाढ झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा ही राज्ये २0१५-१६ ते २0१८-१९ या काळात निर्माण झालेल्या रोजगारांत आघाडीवर आहेत.