किती वाईट! पुतणीच्या लग्नाची वरात येण्यापूर्वी काकाचा मृत्यू; पाठवणीला आजीचा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 01:57 PM2024-02-02T13:57:19+5:302024-02-02T13:58:10+5:30
आपल्या आयुष्यात अशा अनेक छोट्या मोठ्या घटना घडतात ज्यामुळे आपण आपल्या नशीबाला दोष देत बसतो. या नवरी मुलीने काय करावे...
आपल्या आयुष्यात अशा अनेक छोट्या मोठ्या घटना घडतात ज्यामुळे आपण आपल्या नशीबाला दोष देत बसतो. परंतु, एखाद्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत असताना जर घरच्या दोन लोकांचा मृत्यू झाला तर त्याने काय करायचे? लग्नाचा आनंदही घेता येत नाही आणि दु:खही करता येत नाही अशी परिस्थिती. राजस्थानच्या बुंदीमध्ये असाच एक विदारक प्रसंग घडला आहे.
एका कुटुंबात लग्नाची लगबग सुरु होती. सर्वजण नवरदेवाची वरात यायची वाट पाहत होते. वरात येण्यापूर्वीच नवरीच्या काकांनी हृदयविकाराचा झटका आला. जागीच त्यांचा मृत्यू झाला. सर्व कुटुंबावर शोककळा पसरली. हृदयावर दगड ठेवून नवरीचे लग्न लावण्यात आले. परंतु, हा दु:खाचा डोंगर काही कमी होता की काय तिची पाठवणी करताना तिच्या आजीचा मृत्यू झाला.
लग्न घरात मृतदेह ठेवणे योग्य नव्हते म्हणून गावकऱ्यांनी काका गोविंद लाला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. वरात आली होती. लग्नाच्या विधीपूर्वीच कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. लग्नविधी उरकले, कुटुंबीयांनी दु:ख व्यक्त करत तिची पाठवणीची तयारी केली. परंतु तितक्यात ९० वर्षांची आजी मंगली बाई यांनीही प्राण सोडले.