कमांडो असून एवढे घाबरता कशाला; पाकिस्तानी न्यायालयाचा परवेझ मुशर्रफ यांना खोचक सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 09:46 AM2018-06-14T09:46:23+5:302018-06-14T09:46:23+5:30

 मी परत येईन, अशी राजकारण्यासारखी पोपटपंची करणे सोडून मुशर्रफ यांनी देशात परत यावे.

How Can A Commando Be So Afraid Pak Top Court To Pervez Musharraf | कमांडो असून एवढे घाबरता कशाला; पाकिस्तानी न्यायालयाचा परवेझ मुशर्रफ यांना खोचक सवाल

कमांडो असून एवढे घाबरता कशाला; पाकिस्तानी न्यायालयाचा परवेझ मुशर्रफ यांना खोचक सवाल

Next

इस्लामाबाद: एखादा कमांडो स्वत:च्याच देशात यायला इतका कसा काय घाबरू शकतो, असा खोचक सवाल पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना विचारला. 

मुशर्रफ यांना २०१३मध्ये पेशावर हायकोर्टाने निवडणूक लढवण्यास आजन्म अपात्र ठरवले होते. मुशर्रफ यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सध्या मुशर्रफ हे अरब अमिरातीमध्ये वास्तव्याला आहेत. पुरेशी सुरक्षा दिली तरच पाकिस्तानमध्ये परतेन, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुभा दिली होती. मात्र, त्यासाठी बुधवारी होणाऱ्या सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित राहण्याची अट घालण्यात आली होती. या सुनावणीला मुशर्रफ उपस्थित राहिले नाहीत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने लष्कराचे कमांडो असूनही देशात यायला इतके घाबरता का, असा सवाल त्यांना विचारला.  मी परत येईन, अशी राजकारण्यासारखी पोपटपंची करणे सोडून मुशर्रफ यांनी देशात परत यावे. किंबहुना परवेझ मुशर्रफ कमांडो असतील तर त्यांनी देशात येऊनच दाखवावेच, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. दरम्यान, मुशर्रफ यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी आजपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

सुप्रीम कोर्टाने त्यांचे राष्ट्रीय ओळखपत्र आणि पासपोर्ट अनब्लॉक करुनही ते न्यायालयात आले नाहीत. मुशर्रफ यांच्या वकिलांनी मुशर्रफ यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर कोर्टाने नाराजी व्यक्त करून मुशर्रफ यांच्या अटी-शर्तींना कोर्ट बांधील नसल्याचे सांगितले. 

Web Title: How Can A Commando Be So Afraid Pak Top Court To Pervez Musharraf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.