लोकांनी काय पाहावे, हे मूठभर लोक कसे काय ठरवू शकतात? नंदिता दास यांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 01:28 AM2018-01-28T01:28:11+5:302018-01-28T01:28:34+5:30
स्वत:ला संस्कृतीरक्षक म्हणवून घेणारी मूठभर मंडळी आणि देशातील लोकांनी काय पाहावे आणि काय पाहू नये, हे ठरविताना दिसत असून, हा प्रकार अतिशय चिंताजनक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या नंदिता सेन यांनी येथे केले. ‘पद्मावत’च्या निमित्ताने झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये हे वक्तव्य केले.
जयपूर : स्वत:ला संस्कृतीरक्षक म्हणवून घेणारी मूठभर मंडळी आणि देशातील लोकांनी काय पाहावे आणि काय पाहू नये, हे ठरविताना दिसत असून, हा प्रकार अतिशय चिंताजनक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या नंदिता सेन यांनी येथे केले. ‘पद्मावत’च्या निमित्ताने झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये हे वक्तव्य केले.
त्या म्हणाल्या की, सध्याची सेन्सॉरची पद्धत चुकीची आहे. काही मंडळींनीच कलाविष्कारातील काय योग्य व काय अयोग्य ठरविणे आणि त्यांना योग्य वाटेल, तेच लोकांपुढे जाईल, अशी व्यवस्था करणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. कला ही लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कलाकार करीत असतात, पण कलेचा अविष्कारात अडथळे आणण्याचे प्रकार वाढत असून, ही बाब चिंताजनक आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर याप्रकारे घाला आणणे, हे लोकशाहीलाच घातक आहे, असे त्या म्हणाल्या. या निमित्ताने त्यांनी सादत हसन मंटो या प्रख्यात साहित्यिकावरील आपल्या ‘मंटो’ चित्रपटाचाही उल्लेख केला. त्या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावणारे नवाजुद्दिन सिद्दिकी हेही या वेळी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)
प्रसुन जोशी अनुपस्थित
या साहित्य जत्रेचे निमंत्रण सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसुन जोशी यांनाही होते, पण त्यांनी येण्याचे टाळाले. ‘पद्मावत’ चित्रपटाला सेन्सॉरने परवानगी दिल्याने, करणी सेनेने त्यांना जयपूरमध्ये येऊ देणार नाही, अशी धमकी दिली होती. आपल्या उपस्थितीमुळे फेस्टिव्हलमध्ये काही गोंधळ होऊ नये, यासाठी आपण तिथे जाण्याचे टाळले, असे प्रसुन जोशी म्हणाले.
कोट्यवधी लोकांनी काय पाहावे वा पाहू नये, हे सेन्सॉर बोर्डात बसलेले ठरावीक लोक कसे ठरवू शकतात, असा सवाल करून त्यांनी पुढे ‘पद्मावत’ चे नाव न घेता तथाकथित संस्कृती रक्षकांवरही टीका केली. स्वत:ला संस्कृतीचे रक्षक म्हणणाºया मंडळींना हा अधिकार कोणी दिला? - नंदिता दास