माझा इमिग्रंट व्हिसा लवकर कसा प्रोसेस होऊ शकेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 02:36 PM2022-09-04T14:36:02+5:302022-09-04T14:37:13+5:30

इमिग्रंट व्हिसा विलंब होण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे तुमच्या (I-८९४) च्या प्रमाणार्थ तुम्ही दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी असणे.

How can my immigrant visa be processed faster | माझा इमिग्रंट व्हिसा लवकर कसा प्रोसेस होऊ शकेल?

माझा इमिग्रंट व्हिसा लवकर कसा प्रोसेस होऊ शकेल?

Next

प्रश्न : माझ्या व्हिसा प्रकरणात विलंब होणार नाही, यासाठी माझ्या इमिग्रंट व्हिसाच्या मुलाखतीची तयार कशी करावी ? 
उत्तर : तुमचे मुलाखत वेळेचे पत्र अत्यंत बारकाईने वाचा. या पत्राद्वारे तुम्हाला कोणत्या मुद्यांची तयारी मुलाखतीसाठी करायची आहे, ते समजेल. तसेच आमची वेबसाइटही पाहा. याद्वारे तुमच्या ‘इमिग्रंट व्हिसा अर्जाच्या अपॉइंटमेंट पॅकेज’ कागदपत्रांची माहिती मिळेल. याला ‘पॅकेट फोर’ असेही म्हणतात. या कागदपत्राद्वारे मुलाखत प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची माहिती मिळतानाच तुमच्या मुलाखतीचे शेड्युल्ड आणि मुलाखतीची तयारी याची तपशिलात माहिती मिळेल. 

प्रश्न : मी ‘पॅकेट फोर’मधील सूचनांचे पालन केले आहे. मी आणखी काय करू शकतो? 
उत्तर : तुमच्या मुलाखतीची तयारी करताना सर्व कागदपत्रे मुदतीत आहेत, तसेच त्यांची मुदत संपलेली नाही याची दोनदा खातरजमा करा. अर्जदार जेव्हा मुलाखतीसाठी मुदत संपलेल्या कागदपत्रांसह येतो, तेव्हा इमिग्रंट व्हिसा प्रक्रियेला विलंब होतो आणि हेच विलंबाचे सर्वात प्रमुख कारण आहे. तुमचे पोलीस प्रमाणपत्र, जे प्रादेशिक पारपत्र कार्यालयातून येणे गरजेचे आहे आणि ते जारी केलेल्या तारखेपासून दोन वर्षे मुदतीच्या आतील हवे. तुमचे वैद्यकीय प्रमाणपत्र जे जारी केलेल्या तारखेपासून तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीमधील हवे. 

प्रश्न : माझी कागदपत्रे वैध आहेत. आणखी काही? 
उत्तर : इमिग्रंट व्हिसा विलंब होण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे तुमच्या (I-८९४) च्या प्रमाणार्थ तुम्ही दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी असणे. तुमच्या अपॉइंटेमेंटपूर्वी, तुमच्या पीटिशनर आणि / किंवा जॉइंट स्पॉन्सरने I-८६४, I-८६४ A पूर्ण केल्याची खात्री करा. तसेच त्याने त्यासाठी आवश्यक अशी सर्व पूरक कागदपत्रे दिलेली आहेत याची खातरजमा करा. पीटिशनर किंवा जॉइंट स्पॉन्सरचा उत्पन्न तपासण्याचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे त्यांनी सादर केलेल्या ताज्या IRS टॅक्सचा तपशील. हा तपशील ऑनलाइन प्राप्त करता येतो. जर पीटिशनर किंवा जॉइंट स्पॉन्सरने IRS टॅक्सचा तपशील सादर केलेला नसेल तर त्या दोघांनी त्यांचे कर विवरण सादर करणे (IRS form 1040) आणि अनुषंगिक W-2 फॉर्म्स करणे बंधनकारक आहे, ज्यामध्ये त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती आहे. जर तुमची पीटिशन दाखल करून अनेक वर्षे उलटून गेलेली असतील तर अधिक ताजी कर तसेच वित्तीय कागदपत्रे अपलोड करावीत. तुमचे प्रतिज्ञापत्र, अनुषांगिक कर तसेच वित्तीय कागदपत्रे पूर्ण आणि बिनचूक असल्याची खात्री  करा. तुमच्या व्हिसा अर्ज प्रक्रियेतील विलंब टाळण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. 

महत्त्वाची सूचना
व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचे योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचे स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

Web Title: How can my immigrant visa be processed faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.