VIDEO: नेतेहो, कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांना संभ्रमित करायचं कसं?; भाजप कार्यकर्त्याचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 09:50 AM2021-02-23T09:50:05+5:302021-02-23T09:53:06+5:30
Farmers Protest against Farm Laws: कृषी कायद्यांसंदर्भात भाजपकडून बैठकीचं आयोजन; बैठकीतला व्हिडीओ व्हायरल
गुरुग्राम: गेल्या तीन महिन्यांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत. तिन्ही कायदे मागे घ्या ही या आंदोलक शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांना संभ्रमित करण्यात आल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला आहे. मात्र आता एका व्हिडीओमुळे भाजप अडचणीत आला आहे.
"माझी वेळ संपत आलीय"; शेतकरी नेत्यानं भाषणाला पूर्णविराम दिला अन् श्वासही थांबला
हरयाणात कृषी कायद्यांबद्दल संवाद साधण्यासाठी भाजपकडून एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तळागाळातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीतील एक व्हिडीओ समोर आला आहे. 'कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी आमचं ऐकायला तयार नाहीत. कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ दिल्या जाणाऱ्या तर्कांच्या आधारावर ते बोलत नाहीत. त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करावा लागेल,' असं भाजपचा एक कार्यकर्ता व्यासपीठावरील नेत्यांना सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
भाजपा नेता पार्टी अध्यक्ष से केंद्रीय मंत्री व सांसदों के साथ बैठक में किसानों को “बहकाने के मंत्र” माँग रहा है। साफ़ कह रहा है कि आपकी बात सही है कि किसान समझेंगे नहीं बहकाने ही पड़ेंगे।
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) February 22, 2021
अन्नदाता व देश के प्रति भाजपा का असली चेहरा यही है।
चुल्लु भर पानी में डूब मरो।#Farmerspic.twitter.com/XXyHETRIBh
गुरुग्राममध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला भाजपचे हरयाणा युनिटचे प्रमुख ओ. पी. धनखड, क्रीडा मंत्री संदीप सिंह आणि हिसारचे खासदार बृजेंद्र सिंह उपस्थित होते. त्यांच्या समोर एका भाजप कार्यकर्त्यानं शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची गरज असल्याचं म्हटलं. हा व्हिडीओ काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केला आहे. सुरजेवाला यांनी व्हिडीओ शेअर करताना भाजपवर निशाणा साधला आहे.
कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा नेत्यांना ग्रामस्थांनी हाकलले
'भाजपचे कार्यकर्ते पक्षाचे नेते आणि मंत्र्यांना भेटत आहेत. शेतकऱ्यांना कसं मूर्ख बनवायचं याबद्दल ते विचारणा करत आहेत. भाजपकडून दिले जाणारे तर्क शेतकऱ्यांना पटत नाहीत हे यातून स्पष्ट होतं. हाच भाजपचा खरा चेहरा आहे, जो शेतकऱ्यांना दिसत नाही,' असं सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दिल्लीच्या वेशीवर नोव्हेंबरच्या अखेरपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही यावर तोडगा निघालेला नाही.