टीका करणारी शेहला रशीद अचानकच कशी बनली मोदींची फॅन? स्वत: तिनंच सांगितलं, हा आहे टर्निंग पॉइंट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 07:24 PM2023-11-16T19:24:08+5:302023-11-16T19:24:33+5:30
तिच्या बदललेल्या या भूमिकेमुळे ती सध्या चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावरून तिच्या या बदललेल्या भीमिकेचे कारणही सांगितले आहे.
जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अर्थात JNU मधील माजी विद्यार्थिनी आणि भाजप सरकारवर सातत्याने टीका करताना दिसणारी शेहला राशिद आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसत आहे. तिच्या बदललेल्या या भूमिकेमुळे ती सध्या चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावरून तिच्या या बदललेल्या भीमिकेचे कारणही सांगितले आहे.
काय म्हणाली शेहला राशिद? -
शेहला 'X' वर म्हणाली, 'माझ्या हृदयपरिवर्तनाचे कारण म्हणजे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निस्वार्थी व्यक्ती आहेत, जे भारताला बदलण्यासाठी मोठे निर्णय घेत आहेत. त्यांनी प्रचंड टीकांचा सामना केला. मात्र, ते त्यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीवर अढळ आहेत. ज्यात कुणीही मागे राहत नाही."
सरकारचे समर्थन केल्यामुळे होतेय टीका -
एएनआय या वृत्तसस्थेने नुकत्याच घेतलेल्या एका मुलाखतीत तीनी विद्यमान सरकारसंदर्भात स्पष्टपणे भाष्य केले आहे. ती म्हणाली, सरकारवर टीका करणाऱ्या आणि 'लेफ्ट अँड लिबरल' इकोसिस्टममधील लोकांनी सरकारचे समर्थन केले म्हणून आपल्याला घेरले होते. यावेळी तिने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या लॉकडाउन सारख्या निर्णयांचे जबरदस्त कौतुक केले आहे.
शेहला म्हणाली, 'दोन गोष्टी आहेत, मी महामारीमध्ये 2020 मध्ये केलेल्या गेलेल्या काही निर्णयाचे स्वागत करायला सुरुवात केली. त्यावेली मी लॉकडाउनचे समर्थन केले होते. तेव्हा मी एका ईको चेम्बरने घेरले गेले होते. जिच्या सहाय्याने मला तत्काळ गप्प करण्यात आहे. तू सरकारचे समर्थन का करत आहेस? असा त्यांचा प्रश्न होता.'
एवढेच नाही, तर 'मला तेव्हा 2020 मध्ये पहिल्यांदा समजले की, 'आम्ही' यासाठी सरकारवर टीका करत आहोत. यानंतर, मी या मुद्द्यावर आले की, पीएम मोदी काहीतरी करत आहेत म्हणून आपण त्यांना विरोध करायलाच हवा. महत्वाचे म्हणजे, येथे 'आम्ही' चा अर्थ डावे आणि लिबरल ईकोसिस्टम अथवा अशा लोरांशी आहे, जे सरकारवर टीका करणारे आहेत. याच वेळी, तेव्हा केंद्र सरकारकडे लॉकडाउन शिवाय कुठलाही पर्याय नव्हता, असेही शेहलाने म्हटले आहे.