‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 04:52 PM2024-05-29T16:52:41+5:302024-05-29T16:54:42+5:30

Lok Sabha Election 2024: ओदिशामध्ये मागच्या दोन दशकांपासून मुख्यमंत्री असलेल्या नवीन पटनाईक (Naveen Patnaik) यांच्या प्रकृतीचा मुद्दा सद्या केंद्रस्थानी आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र यांनी ओदिशामधील सत्ताधारी बिजू जनता दलाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

"How did Naveen Patnaik's health deteriorate so much in one year, is there any conspiracy?", Modi expressed doubt. | ‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका

‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका

देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. तसेच १ जून रोजी होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी सध्या सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. त्यात ओदिशामध्ये लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुकीसाठीही मतदान होत असल्याने चुरस अधिकच वाढलेली आहे. दरम्यान, ओदिशामध्ये मागच्या दोन दशकांपासून मुख्यमंत्री असलेल्या नवीन पटनाईक यांच्या प्रकृतीचा मुद्दा सद्या केंद्रस्थानी आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र यांनी ओदिशामधील सत्ताधारी बिजू जनता दलाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका वर्षामध्ये नवीन पटनाईक यांची प्रकृती एवढी कशी काय बिघडली? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे. तसेच यामागे कुठल्यातरी लॉबीचा हात असल्याचा संशयही मोदींनी व्यक्त केला आहे.  

ओदिशामधील मयूरभंज येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सध्या नवीनबाबू यांचे सर्व शुभचिंतक चिंतीत आहेत. मागच्या एका वर्षात नवीनबाबू यांची प्रकृती एवढी कशी बिघडली हे पाहून ते त्रस्त झालेले आहेत. अनेक वर्षांपासून नवीनबाबू यांचे निकटवर्तीय मला भेटतात, तेव्हा त्यांच्या प्रकृतीची चर्चाही होते. आता नवीनबाबू यांची प्रकृती बिघडण्यामागे काही कटकारस्थान आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच याबाबत जाणून घेण्याचा ओदिशाच्या जनतेला अधिकार कार आहे. नवीनबाबूंच्या नावाखाली पडद्याआडून ओदिशाची सत्ता चालवत असलेल्या ल़ॉबीचा तर यामागे हात नाही ना? असा प्रश्नही नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थित केला.  

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, या गुपितावरून पडदा उठणं आवश्यक आहे. त्यामुळे १० जूननंतर ओदिशामध्ये भाजपाचं सरकार बनल्यावर आमचं सरकार एक विशेष समिती स्थापन करेल. तसेच अचानक नवीनबाबू यांची प्रकृती कशी काय बिघडत चालली आहे, याचा तपास करेल, असेही मोदी यांनी सांगितले. 

नवीन पटनाईक यांचा प्रचारसभेमधील एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी  त्यांच्या प्रकृतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या व्हिडीओमध्ये नवीन पटनाईक हे भाषण देताना दिसत आहेत. या दरम्यान, त्यांचे हात थरथरताना दिसत असून, बीजेडीचे नेते व्ही.के. पांडियन त्यांचा हात पकडून ही बाब जनतेच्या नरजेपासून लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.  

दरम्यान, नवीन पटनाईक यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला आहे. नवीन पटनाईक यांचं सध्याचं वय ७७ वर्षे आहे. तसेच मागच्या काही काळापासून त्यांचे हात थरथरताना दिसत आहेत. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून भाजपाने बीजू जनता दलाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.  

Web Title: "How did Naveen Patnaik's health deteriorate so much in one year, is there any conspiracy?", Modi expressed doubt.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.