'फोन केला....I love you म्हणाला! पाकिस्तानातील श्रीमंत तरूणीसोबत यासीनने मलिकने कसं केलं लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:10 PM2022-05-26T12:10:42+5:302022-05-26T12:12:31+5:30

Yasin Malik Love Story : मुशाल तिथे तिच्या आईसोबत आली होती. तिने त्या क्षणाची आठवण सांगितलं की, मी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले की, मला तुझं स्पीच आवडलं.

How did Yasin Malik married Pakistani woman Mushaal Mullick | 'फोन केला....I love you म्हणाला! पाकिस्तानातील श्रीमंत तरूणीसोबत यासीनने मलिकने कसं केलं लग्न?

'फोन केला....I love you म्हणाला! पाकिस्तानातील श्रीमंत तरूणीसोबत यासीनने मलिकने कसं केलं लग्न?

googlenewsNext

२००५ साली यासीन मलिक पाकिस्तानात गेला होता. तो काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याचं समर्थन मागण्यासाठी गेला होता. तिथे एका कार्यक्रमात मुशाल हुसैन मलिकने यासीनचं भाषण पहिल्यांदा ऐकलं होतं. यासीनने तेव्हा आपल्या भाषणादरम्यान फैज यांची नज्म वाचली होती.

मुशाल तिथे तिच्या आईसोबत आली होती. तिने त्या क्षणाची आठवण सांगितलं की, मी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले की, मला तुझं स्पीच आवडलं. आम्ही हात मिळवला आणि त्याने मला ऑटोग्राफ दिला. यासीनने तेव्हा मुशालला मित्रांसोबत काश्मीरी आंदोलनाच्या समर्थनात चालवल्या जाणाऱ्या आपल्या सिग्नेचर कॅम्पेनसाठी बोलवलं होतं.

तेव्हा पाकिस्तानहून परत येण्याच्या एक दिवसआधी यासीनने मुशालच्या आईला फोन केला होता. मुशालने सांगितलं की, माझ्या आईने त्याला सांगितलं की, आमचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत. यानंतर यासीनने मला फोन देण्यास सांगितलं. 
सुरूवातीला काही गमती जमती झाल्या. ज्यानंतर यासीनने इंग्रजीत मुशालला I Love You म्हटलं. मुशालने सांगितलं की, त्यावर मी त्याला विचारलं की, तुला पाकिस्तान आवडतो का? तो म्हणाला 'होय, खासकरून तू'. जवळच आई उभी असल्याने मुशाल थोडी नर्वस होती.

ज्यानंतर नेटवर्क नसल्याचं कारण सांगत ती खिडकीजवळ आली. त्यानंतर यासीनने पुन्हा प्रेम व्यक्त केलं. पण यावेळी उर्दूमध्ये. यानंतर मुशालने यासीनचा फोन कट केला. त्याने पुन्हा फोन लावला, पण मुशालने कट केला. ती म्हणाली की, मी स्पीचलेस होते आणि माझं डोकं काम करणं बंद झालं होतं.

तेच मुशालसोबतच्या पहिल्या भेटीबाबत यासीन म्हणाला होता की, ते पहिल्या नजरेतील प्रेम होतं. यासीन म्हणाला की, मी तेव्हाच निर्णय घेतला होता की, मी कधी लग्न केलं तर हिच्यासोबतच करणार.

यासीन भारतात परत आल्यावर मुशाल त्याच्यासोबत MSN Chat वर बोलत होती. दोघांमध्ये प्रेम वाढत गेलं. नंतर कुटुंबियांना हे सांगण्याची वेळ आली. मुशालनुसार, जेव्हा तिच्या आईला दोघांबाबत समजलं तेव्हा ती म्हणाली होती की, ती यासीनच्या स्ट्रगलचा रिस्पेक्ट करते. पण तिला भीती होती की, यासीन पुन्हा तुरूंगात जाऊ शकतो.

नंतर हज दरम्यान यासीनच्या आईची भेट मुशालच्या आईसोबत झाली आणि दोन्ही परिवारात लग्नाची बोलणी ठरली. २२ फेब्रुवारी २००९ ला पाकिस्तानमध्ये दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर मुशाल काश्मीरला आली होती. सध्या ती तिच्या मुलीसोबत पाकिस्तानात राहते.

मुशाल पाकिस्तानातील फार श्रीमंत परिवारातील आहे. तिचे वडील प्रोफेसर एमए हुसैन मलिक एक फेमस इकॉनॉमिस्ट होते. ते जर्मनीच्या बॉन यूनिव्हर्सिटीच्या इकॉनॉमिस्क डिपार्टमेंटचे हेड होते. ते पहिले असे पाकिस्तानी होते ज्यांना नोबल प्राइजसाठी ज्यूरी मेंबर बनवण्यात आलं होतं. प्रोफेसर मलिक यांचं निधन ऑगस्ट २००२ मध्ये हार्ट अटॅकने झालं होतं.
मुशालची आई रेहाना हुसैन पाकिस्तान मुस्लीम लीगच्या महिला विंगची माजी सेक्रेटरी जनरल आहे. तिचा भाऊ वॉशिंग्टन डीसीमध्ये फॉरेन पॉलिसी एनालिस्ट आहे.

यासीन मलिकचं फॅमिली बॅकग्राउंड सामान्य आहे. १९८० च्या दशकात बॉर्डर पार करून पाकिस्तानात येणाऱ्या ५ लोकांमध्ये तोही होता. नंतर तो शस्त्राच्या प्रकरणात होता. त्याला शेकडो वेळा अटक झाली. कैदेत असताना त्याला अनेकदा टॉर्चर करण्यात आलं. त्याला फेशिअल पॅरालिसिस झाला होता. त्याला डाव्या कानाने ऐकू येत नव्हतं आणि त्याचा एक हार्ट व्हॉल्वही डॅमेज झाला.

१९९० मध्ये आरोग्य कारणावरू त्याला सोडण्यात आलं. ज्यानंतर तो स्वत: कधी हिंसा करताना दिसला नाही. त्याने केवळ शालेय शिक्षण घेतलं. तो घरातील एकुलता एक मुलगा आहे आणि कुटुंबाच्या घरात राहतो. त्याला आता त्याच्या कृत्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
 

Web Title: How did Yasin Malik married Pakistani woman Mushaal Mullick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.