तुस्सी ग्रेट हो अभिनंदन; पाकिस्तानी सैन्याचा पोपटच केला ना राव!... व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 10:09 AM2019-03-06T10:09:54+5:302019-03-06T10:28:56+5:30
विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
नवी दिल्ली - भारतीय वायू सेनेतील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असतानाही पाकिस्तानी लष्कारसंदर्भात मजेशीर कमेंट अभिनंदन यांनी केल्याचं या व्हीडिओत दिसत आहे. पाकिस्तानी सैन्याने लोकांच्या तावडीतून अभिनंदन यांची सुटका केल्यानंतर त्यांना जीपमधून नेण्यात आले होते. त्यावेळी हा व्हीडिओ चित्रीत करण्यात आला आहे.
विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवताना अभिनंदन यांच्या मिग 21 या विमानाला अपघात झाला. त्यामुळे, पॅराशूटचा आधार घेत अभिनंदन यांनी हवेतून जमिनीवर झेप घेतली. मात्र, त्यावेळी ते सीमारेषेपलिकडे म्हणजेच पाकिस्तानच्या हद्दीत अडकले. अभिनंदन यांना पाहताच पाकिस्तानी नागरिकांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, रक्तबंबाळ झालेल्या अभिनंदन यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये पाकिस्तानी लष्कराकडून अभिनंदन यांचा ताबा घेण्यात आल्याचे दिसत होते. त्याचदरम्यान, अभिनंदन यांना सीमारेषेवरुन पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पमध्ये एका जीपमधून नेण्यात आले. त्यावेळीही, पाकिस्तानी सैन्याने त्यांचा एक व्हीडिओ बनवला होता. सध्या, तो व्हीडिओ व्हायरल होत आहे.
विंग कमांडर अभिनंदन यांचा आणखी एक व्हीडिओ व्हायरल#Abhinandan#WingCommandarAbhinandan#ViralVideospic.twitter.com/tEEHoKZusL
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 6, 2019
या व्हीडिओत त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आल्याची दिसून येते. तसेच तुम्ही पाकिस्तानी सैन्याकडे कसे पाहता ? असा प्रश्न पाकिस्तानच्या रेंजर्संकडून अभिनंदन यांना विचारण्यात आला होता. त्यावर, कमांडर अभिनंदन यांनी त्यांच्या धाडसीस्टाईलने उत्तर दिल्याचे दिसत आहे. माझ्या मनात पाकिस्तानी सैन्याबद्दल आदर असून पाकिस्तानी सैन्याशी माझी भेट होईल, अशी मला आशा होती. मला माहितीय पाकिस्तानी सैन्यातही सैनिकच आहेत. त्यामुळेच मी तुम्हाला पहिला प्रश्न केला की, आपण पाकिस्तानचं नियमित सैन्य आहात का ? असे धाडसी उत्तर अभिनंदन यांनी दिल्याचे या व्हीडिओतून दिसून येते. अभिनंदन यांचा हाही व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक केलं जात आहे.
पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवून लावताना 27 फेब्रुवारी रोजी पाकच्या कचाट्यात सापडलेल्या अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारत सरकारनं पाकिस्तानवर जगभरातून दबाव आणला. त्यानंतर 1 मार्चला अभिनंदन यांची सुटका झाली. वाघा बॉर्डरवरुन ते मायदेशी परतले. त्यावेळी त्यांचं एखाद्या नायकाप्रमाणे जल्लोषात स्वागत झालं. यानंतर त्यांना उपचारांसाठी सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनंदन लवकरच कॉकपिटमध्ये परतावेत, अशी इच्छा सैन्यातील अधिकाऱ्यानी बोलून दाखवली आहे.