बनावट लस ओळखायची कशी? फसवणुकीपासून राहा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 08:46 AM2021-07-01T08:46:28+5:302021-07-01T08:46:50+5:30
या गोष्टी आवर्जून पाहा
मुंबईत ३५० लोकांना व पश्चिम बंगालमधील खासदार मिमी चक्रवर्ती यांनाही बनावट लस दिल्याचे प्रकरण उजेडात आले. एकंदरच बनावट लसीकरणाचे हे प्रमाण वाढीस लागले आहे. हे असे का होते, पाहू या.
या गोष्टी आवर्जून पाहा
लस कुपीवर लेबल नीट लागले नसल्यास किंवा लेबलच गायब असल्यास.
लेबलवर एक्स्पायरी तारीख किंवा स्टोअरेजची माहिती नसल्यास
देशात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांत बनावट लसीकरणाची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
nकुपीचे पॅकिंग दोनदा केल्याचे आढळल्यास
nकुपीवर स्पेलिंगच्या चुका असल्यास
nकुपीवर खाडाखोड
केली असल्यास किंवा कुपी जुनाट दिसत असल्यास
nकुपीतील द्रवात ग्लुकोजच्या पाण्यसारखा द्रव तरंगत असल्याचे दिसल्यास
बनावट लसीकरणाची नोंद आतापर्यंत कुठे कुठे झाली आहे ?
अमेरिका, मेक्सिको, पोलंड आणि चीन या देशांमध्येही असे प्रकार घडले आहेत.
लसीकरणानंतर संदेश व प्रमाणपत्र कधी येते?
लसीचा डोस घेतल्यानंतर पाच मिनिटांच्या आत तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर संदेश येतो. तसेच तासाभरानंतर कोविन पोर्टलवर प्रमाणपत्रही येते. त्यामुळे लस घेतल्यानंतर प्रमाणपत्र थोड्या दिवसांनी
दिले जाईल, असे जर कोणी
सांगितले तर त्याची कारणे
जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते.
बनावट लसीचा काय परिणाम होतो?
लसीचा डोस बनावट असेल तर लसीकरणानंतर दिसून येणारी लक्षणे दिसणार नाहीत. साधारणत: लस घेतल्यानंतर ८० टक्के लोकांमध्ये हात दुखणे, सौम्य ताप येणे, थकवा जाणवणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. ही सर्व लक्षणे न आढळल्यास लस बनावट होती, हे समजावे.
nनकली संकेतस्थळावर लस नोंदणीच्या नावाने फसवणूक.
nबायडेन प्रशासनाने अशा दोन डझनहून अधिक संकेतस्थळांवर कारवाई केली.
मेक्सिको
nफायझरची लस देत असल्याची बतावणी करत ८० जणांची फसवणूक करण्यात आली.
nया सर्व जणांकडून प्रत्येकी १०० डॉलर शुल्क आकारण्यात आले.
पोलंड
nकोरोनाप्रतिबंधक लसीच्या नावाखाली त्वचेवरील सुरकुत्या दूर करणारे औषध पाणी घालून टोचण्यात आले.
nयाप्रकरणी पोलंड सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
चीन
nचिनी पोलिसांनी देशातील विविध ठिकाणी धाडी टाकून बनावट लसींच्या कुप्या जप्त केल्या आहेत.
nआतापर्यंत तेथे ८० जणांना अटक करण्यात आली आहे.