2,700 कोटींचं हे ‘भारत मंडपम’ आतून आहे तरी कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 06:02 IST2023-09-10T06:02:06+5:302023-09-10T06:02:51+5:30
भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी वास्तू

2,700 कोटींचं हे ‘भारत मंडपम’ आतून आहे तरी कसे?
नवी दिल्ली : जी २० शिखर परिषद ‘भारत मंडपम’ या ठिकाणी हाेत आहे. भव्य आणि पाहताक्षणी डाेळ्यांचे पारणे फिटेल, अशी रचना या स्थळाची करण्यात आली आहे. भारताच्या संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी हाेते. यासंदर्भात काही महत्त्वाच्या गाेष्टी जाणून घेऊ या...
२६ जुलै २०२३ राेजी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘भारत मंडपम’चे उद्घाटन केले. आंतरराष्ट्रीय पातळीवरची संमेलने, समाराेह, परिषदांचे आयाेजन करता यावे यासाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेवर आधारित भव्य स्थळाची उभारणी करण्यात आली आहे.