पत्नी न्यायाधीश, भाऊ IAS; पण रोख 10 हजार नसल्याने Deputy Director चा गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 10:54 AM2024-09-02T10:54:55+5:302024-09-02T10:58:44+5:30
Deputy Director Died in Kanpur: आरोग्य विभागात उप संचालक असलेल्या आदित्य वर्धन सिंह यांचा गंगेत बुडून मृत्यू झाला. भाऊ IAS आणि पत्नी न्यायाधीश असलेल्या सिंह यांच्या मृत्यू वेळी घडलेला घटनाक्रम धक्कादायक आहे.
Kanpur Latest News :उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आरोग्य विभागात उप संचालक म्हणून कार्यरत असलेल्या आदित्य वर्धन सिंह यांचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाला. चुलत भाऊ IAS, पत्नी न्यायाधीश आणि स्वतः मोठ्या पदावर असलेल्या आदित्य वर्धन सिंह यांना वाचवता आले असते. पण, 10 हजार रुपये रोख रक्कम नसल्याने विलंब झाला अन् तोपर्यंत त्यांना मृत्यूने गाठले. (Deputy Director drowned in Ganga)
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील नाना मऊ घाटावर शनिवारी (३१ ऑगस्ट) आरोग्य उप संचालक आदित्य वर्धन सिंह हे प्रदीप तिवारी आणि मित्रांसोबत गंगेत स्नान करायला गेले होते. त्यांची पत्नी शैलजा मिश्रा या महाराष्ट्रात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. तर चुलत भाऊ अनुपम सिंह बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सचिव आहेत.
गंगा नदीत आदित्य वर्धन सिंह कसे बुडाले?
मयत आरोग्य उप संचालक आदित्य वर्धन सिंह यांच्या मित्राने घटना कशी घडली त्याबद्दल माहिती दिली. गंगा नदीत स्नान करत असताना आदित्य वर्धन सिंह हे फोटो काढत होते. त्याचवेळी नद्दीतील खड्डयात ते घसरले आणि बुडायला लागले.
आदित्य वर्धन सिंह बुडत असल्याचे बघून मित्रांनी लगेच गोताखोरांना बोलावले. गोताखोरांनी त्यासाठी 10 हजार रुपये मागितले. मित्र म्हणाले की, आमच्या जवळ १० हजार रुपये रोख नाहीये. ऑनलाईन पाठवतो. गोताखोरांनी बाजूला असलेल्या शैलेश कश्यपच्या दुकानावर नेऊन १० हजार रुपये पाठवायला सांगितले. पैसे खात्यात जमा होताच, ते गंगेच्या पात्रात उतरले. तोपर्यंत आदित्य वर्धन सिंह हे पाण्यात बुडाले होते.
पोलीस आणि एसडीआरएफला बोलावले पण...
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर एसडीआरएफच्या पथक, गोताखोर बोलावण्यात आले. रात्रीपर्यंत आदित्य वर्धन सिंह यांच्या गंगा नदीत शोध घेण्यात आला, पण अपयश आले. पोलीस सध्या त्यांचा गंगेत शोध घेत आहे.