Lockdown: जिल्ह्यांचा लॉकडाऊन कसा उठवायचा? ICMR ने ठरविले निकष, राज्ये पाळणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 07:11 PM2021-06-01T19:11:32+5:302021-06-01T19:24:55+5:30

How to lift Lockdown in States; ICMR Told: लॉकडाऊन हा मोठ्या काळासाठीचा उपाय नाहीय, असे सांगत लॉकडाऊन कसा हळू हळू संपवावा आणि त्याचा पर्याय कसा शोधावा याबाबतही तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 

How to lift lockdown? The ICMR Director General Balram Bhargava told three stages | Lockdown: जिल्ह्यांचा लॉकडाऊन कसा उठवायचा? ICMR ने ठरविले निकष, राज्ये पाळणार...

Lockdown: जिल्ह्यांचा लॉकडाऊन कसा उठवायचा? ICMR ने ठरविले निकष, राज्ये पाळणार...

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Corona Second wave) पुरता गळीतगात्र झालेल्या देशाला कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्सिजनची टंचाई, बेडची कमतरता, हॉस्पिटल भरलेली या परिस्थितीत हजारो लोकांनी आपले नातलग गमावले आहेत. हॉस्पिटल अपुरी पडू लागल्याने अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला होता. आता ही दुसरी लाट हळू हळू ओसरू लागल्याने लॉकडाऊनमध्येही सूट देण्यास सुरुवात झाली आहे. (Gradual lifting (of lockdown) will not witness a massive surge. : Balram Bhargava, Director General, ICMR)

CoronaVirus in China: चीनमध्ये कोरोना पुन्हा परतला; मोठे शहर लॉकडाऊन, प्रांतामध्ये निर्बंध 


पहिल्या लॉकडाऊन प्रमाणेच दुसऱ्या लॉकडाऊनचा परिणामही जनजीवनावर झाला आहे.  आयसीएमआरचे महानिदेशक डॉ. बलराम भार्गव यांनीही लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचे कबुल केले आहे. मात्र, लॉकडाऊन हा मोठ्या काळासाठीचा उपाय नाहीय, असे सांगत लॉकडाऊन कसा हळू हळू संपवावा आणि त्याचा पर्याय कसा शोधावा याबाबतही तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 




भार्गव यांनी सांगितले की, जिथे हळू हळू लॉकडाऊन शिथिल केला जाईल त्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट गेल्या सात दिवसांत 5 टक्क्यांहून कमी असायला हवा. सोबतच 60 वर्षांहून अधिक वयाच्या आणि 45 वर्षे वयाच्या त्या लोकांना ज्यांच्यामध्ये अन्य कोणताही गंभीर आजार नाहीय त्यांच्यापैकी 70 टक्क्यांहून अधिक लोकांना लस दिलेली असायला हवी. याशिवाय नागरिकांनाही त्यांची जबाबदारी समजायला हवी. देशात डिसेंबरपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

CoronaVirus: निरागसांना कोण समजावणार? कोणी आई, तर कोणी बाप गमावला; कोरोनाच्या संकटात 1742 मुले अनाथ


लसीकरणाबाबत लोकांनी धीर धरावा. भारत जगातील पाच देशांपैकी एक आहे जो लस बनवितो. अमेरिकेत जेवढी लस दिली गेली, तेवढीच आपल्याकडेही देण्यात आली. परंतू आपली लोकसंख्या अमेरिकेच्या चौपट आहे. जुलै, ऑगस्टपर्यंत आपल्याकडे पुरेशी लस असणार आहे, असे ते म्हणाले. 




केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 21.58 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. सोमवारी 18-44 वयोगटाच्या लोकांना 12,23,596 पहिला डोस देण्यात आला. तर 13402 लोकांना दुसरा डोस देण्यात आला. देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सुरुवातीपासून 2,02,10,889 लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 23,491 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 

Web Title: How to lift lockdown? The ICMR Director General Balram Bhargava told three stages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.