आणखी किती काळ आपण भांडणार? शहा-राऊत यांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:34 AM2018-08-09T04:34:37+5:302018-08-09T04:34:57+5:30

राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे आहे. शिवसेनेची ३ मते रालोआच्या बाजूने आहेत की नाहीत, याविषयी अमित शहांना शंका होती.

How long will we dispute? Shah-Rout discussions | आणखी किती काळ आपण भांडणार? शहा-राऊत यांची चर्चा

आणखी किती काळ आपण भांडणार? शहा-राऊत यांची चर्चा

googlenewsNext

- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत प्रत्येक मत महत्वाचे आहे. शिवसेनेची ३ मते रालोआच्या बाजूने आहेत की नाहीत, याविषयी अमित शहांना शंका होती. त्यासंबंधी शहा आणि संजय राऊत यांच्या खास भेटीची रंजक माहिती हाती आली आहे.
जद (यु)चे हरिवंश यांना सत्ताधारी आघाडीने उमेदवार बनवल्यावर शंकेचे निरसन करण्यासाठी शहा थेट उध्दव ठाकरेंशी फोनवर बोलले. यावेळी संजय राऊत यांच्याशी बोला, असे त्यांनी शहांना सुचवले. मंगळवारी संसदेच्या आवारात शहा सकाळपासून राऊतांना शोधत होते. जेटलींच्या दालनात शहा तुमची वाट पहात आहेत असा निरोप एका दूतामार्फत राऊत यांना पाठवला. पण राऊत तिथे पोहोचेपर्यंत शहा राज्यसभा सभागृहात गेले होते. मग राऊतही तिथे गेले. राऊत यांना पहाताच शहांनी त्यांना आसनाजवळ बोलावले. शहा राऊतांना म्हणाले, ‘आणखी कितीकाळ आपण भांडणार आहोत? परवा हरिवंश यांची निवडणूक आहे. तुमची भूमिका नेमकी काय?’ त्यावर राऊत म्हणाले, ‘आपले भांडण आहे कुठे? काही मुद्यांवर मतभेद असलेच तर ते सोडवण्याचा फॉर्म्युला काय? ते तुम्हीच सांगा’. त्यावर शहा म्हणाले, ‘बाकीचे आपण नंतर पाहू, तूर्त उपसभापती पदाची महत्वाची निवडणूक आहे.’ राऊत त्यावर तत्परतेने म्हणाले ‘महाराष्ट्रातला मराठी उमेदवार जर मैदानात असेल तर शिवसेना त्याच्या बाजूने ठामपणे उभी राहिल याचे कारण आमची परंपरागत भूमिका तीच आहे’. यावेळी मागे बसलेल्या थावरचंद गहलोतांच्या समोरच्या माईकमुळे हे संभाषण अन्य सदस्यांनाही ऐकू येत होते. गहलोतांनी तसे दोघांना सांगितलेही. दरम्यान राऊतांचे उत्तर ऐकल्यावर शहा अस्वस्थ झालेले दिसले.
>उपसभापती पदासाठी काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद
राज्यसभेच्या उपसभापती पदाची ९ आॅगस्टला होणारी निवडणूक सत्ताधारी आघाडीबरोबरच विरोधकांच्या एकजुटीचीही एकप्रकारे लिटमस टेस्टच आहे. रालोआतर्फे जद (यु)चे हरिवंश नारायण प्रसाद, तर विरोधकांतर्फे काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद अशी सरळ लढत आहे. गुप्त मतदान नसल्याने कोणता पक्ष कोणाच्या बाजूने आहे, हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे.

Web Title: How long will we dispute? Shah-Rout discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.