डिजिटल इंडियाचे स्वप्न विजेअभावी साकारणार कसे?

By Admin | Published: September 4, 2015 10:46 PM2015-09-04T22:46:46+5:302015-09-04T22:46:46+5:30

देशात अनेक गावांमध्ये वीजच नाही, मग डिजिटल इंडियाचे स्वप्न कसे साकारणार? असा रोकडा सवाल उत्तराखंडच्या सार्थक भारद्वाज

How to make Digital India dream of power? | डिजिटल इंडियाचे स्वप्न विजेअभावी साकारणार कसे?

डिजिटल इंडियाचे स्वप्न विजेअभावी साकारणार कसे?

googlenewsNext

नवी दिल्ली : देशात अनेक गावांमध्ये वीजच नाही, मग डिजिटल इंडियाचे स्वप्न कसे साकारणार? असा रोकडा सवाल उत्तराखंडच्या सार्थक भारद्वाज याने शुक्रवारी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला माणेकशॉ सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. त्यावर मोदींनी २०२२ पर्यंत प्रत्येक गावात, प्रत्येक घरी २४ तास वीज राहील, अशी ग्वाही दिली. त्यांनी देशभरातील विद्यार्थी, शिक्षकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना त्यांच्या रोखठोक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. अनेकदा गुगली टाकत त्यांना हसवले, तर कधी ते आपल्या शालेय जीवनातील आठवणींमध्ये रमले.
देश २०२२ साली ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार असून त्यावेळी प्रत्येक घरी २४ तास वीज राहील, असे आश्वासन त्यांनी शाळकरी मुलांशी संवाद साधताना दिले. सध्या १८ हजार गावांमध्ये वीज नाही. येत्या एक हजार दिवसांमध्ये या गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले आहेत. डिजिटल इंडियाचा ‘मार्च ’रोखला जाऊ शकत नाही. सौर ऊर्जेचा वापर करीतही हे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

मोदींनी देशभरातील ८०० विद्यार्थी आणि दिल्लीच्या विविध शाळांमधील ६० शिक्षकांशी सुमारे १०५ मिनिटे संवाद साधला. नऊ राज्यांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी चांगले वक्ता कसे बनलात? तुमच्या कपड्यांचे फॅशन डिझायनर कोण आहेत? कोणता खेळ आवडतो? यासारखे बालसुलभ प्रश्न विचारले.
प्रश्न : योगदिन म्हणून २१ जूनचीच निवड का?
उत्तर : हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा दिवस आहे. सूर्य हा ऊर्जेचा पृथ्वीवरील सर्वात मोठा स्रोत असून त्या दिवशी साहजिकच सर्वाधिक ऊर्जा मिळते. त्यामुळे या दिवसाची निवड केली. अनेकांनी याबाबत प्रश्न विचारले; मात्र प्रथमच मी त्याबाबत खुलासा करीत आहे.
प्रश्न : चांगले वक्ते कसे बनलात?
उत्तर : दिल्लीच्या पुष्पविहारमधील केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया सिंग हिच्या या प्रश्नावर मोदी म्हणाले की, चांगला वक्ता बनण्यासाठी आधी चांगला श्रोता बनण्याची आवश्यकता आहे. कोण काय म्हणेल, कुणी हसेल काय याची चिंता नको. हसणार असतील तर हसू द्या, मात्र जे सांगायचे ते आत्मविश्वासाने बोला. तुम्ही तथ्य आणि माहितीच्या आधारावर बोलाल तेव्हा चांगले वक्ते बनाल. गुगल, यू-ट्यूबवर जगभरातील मान्यवरांची चांगली भाषणे असतात.

Web Title: How to make Digital India dream of power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.