'किती कोटी हुंडा मिळाला?', IRS अधिकाऱ्याच्या लग्नाच्या फोटोवर कमेंट; मिळालं जशास तसं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 12:43 PM2022-01-30T12:43:24+5:302022-01-30T12:44:22+5:30

सोशल मीडियात सध्या आयआरएस अधिकाऱ्याचं ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. एका अधिकाऱ्यानं नुकतंच त्याच्या विवाह सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियात अपलोड केले.

how many crore rs dowry in wedding irs officer reacts over twitter user dowry comment | 'किती कोटी हुंडा मिळाला?', IRS अधिकाऱ्याच्या लग्नाच्या फोटोवर कमेंट; मिळालं जशास तसं उत्तर...

'किती कोटी हुंडा मिळाला?', IRS अधिकाऱ्याच्या लग्नाच्या फोटोवर कमेंट; मिळालं जशास तसं उत्तर...

Next

नवी दिल्ली-

सोशल मीडियात सध्या आयआरएस अधिकाऱ्याचं ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. एका अधिकाऱ्यानं नुकतंच त्याच्या विवाह सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियात अपलोड केले. ज्यावर नेटिझन्स लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. अशातच एका युझरनं या आयआरएस अधिकाऱ्याला किती कोटी हुंडा मिळाला? असा सवाल उपस्थित करुन खळबळ उडवून दिली. आयआरएस अधिकाऱ्यानंही युझरच्या प्रश्नाला जशास तसं उत्तर दिलं आहे. 

आयआरएस अधिकारी विकास प्रकाश सिंह (Vikas Prakash Singh, IRS) यांच्यासोबत हा किस्सा घडला आहे. विकास सिंह यांनी २८ जानेवारी रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचे फोटो अपलोड केले. सोशल मीडियात विकास सिंह यांचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. त्यामुळे फोटोवर भरपूर कमेंट्स नेटिझन्स करु लागले. पण एका नेटिझनच्या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. "किती कोटी रुपयांचा हुंडा मिळाला?", असा सवाल एका युझरनं केला. 

आयआरएस अधिकारी विकास प्रकाश सिंह यांनीही या युझरच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. "जेव्हा लग्न करशील तेव्हा लक्षात येईल की प्रेम विवाहामध्ये पत्नी मिळणं हीच खूप मोठी गोष्ट असते", असा रिप्लाय विकास सिंह यांनी दिला आहे. 

पहिलं करिअर की प्रेम?
एका ट्विटर युझरनं तुम्ही आधी करिअरवर लक्ष केंद्रीत केलं की प्रेमावर? असा प्रश्न विचारला. त्यावर विकास सिंह यांनी दोघांचाही उत्तम समन्वय साधला असं म्हटलं. पण प्रत्येकानं हे स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्यावा, असंही प्रकाश सिंह म्हणाले. 

Web Title: how many crore rs dowry in wedding irs officer reacts over twitter user dowry comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.