भारत, पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 10:26 AM2024-01-02T10:26:44+5:302024-01-02T10:27:08+5:30

काश्मीर प्रश्न, तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

How many nuclear weapons do India and Pakistan have | भारत, पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत किती?

भारत, पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत किती?

नवी दिल्ली : भारतपाकिस्तानने त्यांच्याकडे किती अण्वस्त्रे आहेत, याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण सोमवारी केली. दोन्ही देशांनी परस्परांवर अण्वस्त्र हल्ला करू नये, असा करार करण्यात आला होता. त्यामुळे १९९२ पासून दोन्ही देश ही माहिती एकमेकांना देत आहेत. 

काश्मीर प्रश्न, तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारतपाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तरी देखील आपल्याकडील अण्वस्त्रांची माहिती देण्याची कार्यवाही दोन्ही देशांनी थांबविलेली नाही. आतापर्यंत सलग ३३ वेळा अण्वस्त्रांची यादी दोन्ही देशांनी परस्परांना दिली आहे.

मच्छीमार, नागरिकांची तुरुंगातून मुक्तता करा : भारताची मागणी
पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या व शिक्षेचा कालावधी संपलेल्या १८४ भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या १२ भारतीय नागरिकांशी भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांशी संपर्क प्रस्थापित व्हायला हवा, असेही भारताने म्हटले आहे. 
सागरी हद्द ओलांडल्यामुळे दोन्ही देश परस्परांच्या मच्छीमारांना अटक करतात. दरवर्षी १ जानेवारी व १ जून रोजी त्यांच्या यादीची देवाण-घेवाण करतात. 

Web Title: How many nuclear weapons do India and Pakistan have

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.