देशात राजकीय पक्ष आहेत तरी किती? १९५१ साली ५३ पक्ष रिंगणात, आता किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 12:48 PM2024-03-23T12:48:14+5:302024-03-23T12:48:46+5:30

काँग्रेसने जिंकल्यात सर्वाधिक लोकसभा निवडणुका

How many political parties are there in the country? 53 parties in the arena in 1951, how many now? | देशात राजकीय पक्ष आहेत तरी किती? १९५१ साली ५३ पक्ष रिंगणात, आता किती?

देशात राजकीय पक्ष आहेत तरी किती? १९५१ साली ५३ पक्ष रिंगणात, आता किती?

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात १९५१ साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत ५३ राजकीय पक्ष रिंगणात उतरले होते. आता राजकीय पक्षांची संख्या २५०० वर पोहोचली आहे. मात्र, गेल्या सात दशकांत राष्ट्रीय पक्षांचा आकडा १४ वरून ६ पर्यंत खाली घसरला आहे. भारतातील निवडणुकांच्या इतिहासाचा आढावा घेणारे ‘लिप ऑफ फेथ’ हे पुस्तक निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केले आहे. त्यात बरीच रंजक माहिती देण्यात आली आहे.

१९९६मध्ये २०९ पक्ष; २,५०० एकूण पक्ष देशभरात; कधी किती पक्ष?

वर्ष    एकूण पक्ष    राष्ट्रीय पक्ष

  • १९९२    उपलब्ध नाही    ०७

(भाजप, काँग्रेस, भाकप, माकप, जनता दल, जनता पार्टी, लोक दल)

  • १९९६    २०९    ०८

(काँग्रेस, ऑल इंडिया काँग्रेस (तिवारी), भाजप, माकप, भाकप, जनता दल, जनता पार्टी, समता पार्टी)

  • २०१४    ४६४    ६

(भाजप, काँग्रेस, भाकप, माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, बसप)

  • २०१९    ६७४    ०७

(भाजप, काँग्रेस, बसप, भाकप, माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस)

राष्ट्रीय पक्ष

  • १९५२- १४
  • १९९२- ०७
  • १९९६- ०८
  • २००२४- ०६


यांचा राष्ट्रीय दर्जा गेला...

- आता तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. 
- ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.
- १९५३ नंतर अखिल भारतीय हिंदू महासभा, ऑल इंडिया भारतीय जनसंघ, रेव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (मार्क्सिस्ट गट) (एफबीएल-एमजी), ऑल इंडिया फाॅरवर्ड रेव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (आरसीपीआय) या पक्षांनी आपला राष्ट्रीय दर्जा गमावला.

काँग्रेसने जिंकल्या सर्वाधिक लोकसभा निवडणुका

१९६२ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत २७ पक्षांनी लढत दिली होती. त्यामध्ये ६ राष्ट्रीय पक्षांचा सहभाग होता. सोशालिस्ट (एसओसी), स्वतंत्र (एसडब्ल्यूए) या पक्षांनाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. १९५१ पासून झालेल्या १४ लोकसभा निवडणुकांपैकी ११ निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची लाट होती.

 

Web Title: How many political parties are there in the country? 53 parties in the arena in 1951, how many now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.