Karnataka Election : कर्नाटकात भाजपला किती जागा मिळतील? चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या येडियुरप्पांनी केला 'हा' दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 03:14 PM2023-05-08T15:14:36+5:302023-05-08T15:14:58+5:30

Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसवर आक्रमकपणे हल्लाबोल करत आहेत. भाजप सातत्याने विजयाचा दावा करत आहे. 

How many seats will BJP get in Karnataka? Yeddyurappa, who has been Chief Minister for four times, made this claim! | Karnataka Election : कर्नाटकात भाजपला किती जागा मिळतील? चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या येडियुरप्पांनी केला 'हा' दावा!

Karnataka Election : कर्नाटकात भाजपला किती जागा मिळतील? चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या येडियुरप्पांनी केला 'हा' दावा!

googlenewsNext

कर्नाटकात आज संध्याकाळी 6 वाजता निवडणुकीसाठी धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावणार आहेत. दोन दिवसांनी म्हणजे 10 मे रोजी निवडणुका होणार आहेत. मात्र, यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election) मुद्दे बदलले आहेत, चित्र बदलले आहे. प्रत्येक बाबतीत भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत आहे. निवडणूक रॅली असो की आक्रमक शैली. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसवर आक्रमकपणे हल्लाबोल करत आहेत. भाजप सातत्याने विजयाचा दावा करत आहे. 

दरम्यान, कर्नाटकचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी दावा केला आहे की विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. इतकेच नाही तर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकणार आहे, हेही बीएस येडियुरप्पा यांनी सांगितले. ते म्हणाले की, "पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकातील परिस्थिती समजून घेण्यासाठी रोड शो आणि रॅली केल्या. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपण 135 जागा जिंकू, असा मला विश्वास आहे. काँग्रेस हे बुडणारे जहाज आहे, त्यांचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनी 4-5 महिने प्रचार करूनही यूपीमध्ये केवळ 2-3 जागा जिंकल्या."

निवडणुकीत 'हे' मुद्द्ये गाजले
बजरंग बली, पीएफआय, मुस्लिम आरक्षण, भ्रष्टाचार आणि रोजगार हे पाच मुद्दे कर्नाटकातील निवडणुकीचे चित्र आणि राजकीय पक्षांचे भवितव्य ठरवतील. 2 मेपूर्वी कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस अनेक मुद्द्यांवर भाजपला घेरत होती. यामध्ये भ्रष्टाचार आणि रोजगाराचा मुद्दा सर्वात मोठा होता. पण, 2 मे रोजी काँग्रेसच्या जाहीरनाम्यानंतर परिस्थिती अशी वळली की बाकीचे मुद्दे स्पष्ट झाले. आता फक्त बजरंग बली आणि पीएफआयचा मुद्दा कर्नाटकात उरला आहे.

जुनी परंपरा मोडीत काढण्यासाठी भाजप प्रयत्नशील
दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची राज्याची 38 वर्षे जुनी परंपरा मोडीत काढण्यासाठी आणि दक्षिणेकडील बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वतःला मुख्य विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी काँग्रेस भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे. तसेच, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस प्रचारात आपली सर्व शक्ती पणाला लावताना दिसला. त्यांना 'किंगमेकर' नव्हे तर 'किंग' बनून स्वबळावर सरकार स्थापन करण्याची आशा आहे.
 

Web Title: How many seats will BJP get in Karnataka? Yeddyurappa, who has been Chief Minister for four times, made this claim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.