जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवादी आहेत? यात पाकिस्तानी आणि स्थानिक किती? मोठा खुलासा समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 03:55 PM2024-11-13T15:55:51+5:302024-11-13T15:57:28+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या किती दहशतवादी आहेत, जे धोकादायक घटना घडवण्याचा कट आखत आहेत, याचीही माहिती समोर आली आहे.

how many terrorists are present in jammu and kashmir know numbers of pakistani and local terrorists  | जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवादी आहेत? यात पाकिस्तानी आणि स्थानिक किती? मोठा खुलासा समोर

जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवादी आहेत? यात पाकिस्तानी आणि स्थानिक किती? मोठा खुलासा समोर

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. याचे कारण पाकिस्तानकडून पाठवले जाणारे दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांचीही सातत्याने खात्मा केला जात आहेत. दरम्यान, २०२४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये ६१ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. याचबरोबर, जम्मू-काश्मीरमध्ये सध्या किती दहशतवादी आहेत, जे धोकादायक घटना घडवण्याचा कट आखत आहेत, याचीही माहिती समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवादी आहेत?
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जवळपास ११९ दहशतवादी आहेत. यातील ७९ दहशतवादी काश्मीर भागात आहेत, तर ४० दहशतवादी जम्मू भागात घुसले आहेत. दरम्यान, ११९ दहशतवाद्यांपैकी बहुतांश पाकिस्तानी दहशतवादी आहेत. त्यापैकी ९५ दहशतवादी पाकिस्तानचे आहेत. काश्मीरमध्ये ६१ पाकिस्तानी दहशतवादी आहेत, तर ३४ पाकिस्तानी दहशतवादी जम्मूमध्ये आहेत. याचबरोबर, काश्मीरमध्ये १८ स्थानिक दहशतवादी आणि जम्मूमध्ये ६ स्थानिक दहशतवादी आहेत.

LOC आणि सीमा किती लांब आहे?
पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (LOC) आणि भारत यांच्यातील अंतर काश्मीरपासून ३४३.९ किलोमीटर आहे. तसेच, जम्मूपासून एलओसी २२४.५ किलोमीटर अंतरावर आहे. त्याचवेळी, अखनूर ते लखनपूरपर्यंत भारत आणि पाकिस्तान दरम्यान २०९.८ किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे.

पाकिस्तान निरक्षर आणि बेरोजगार मुलांना दहशतवादी बनवतंय
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आपल्या गरीब आणि अशिक्षित मुलांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करत आहे. पाकिस्तानी लष्कराचे एसएसजी आणि आयएसआय निरक्षर मुलांना भारतात घुसवून त्यांना दहशतवादी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. ॲप्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील निरक्षर मुलांना दहशतवादी बनण्यास प्रवृत्त केले जात आहे. पाकिस्तान आपल्याच बेरोजगार आणि अशिक्षित मुलांना कमी खर्चात दहशतवादी बनण्याचे प्रशिक्षण देऊन भारतात घुसखोरी करत आहे. अशा निरक्षर मुलांना मासिक १० ते १५ हजार रुपये मानधन दिले जात आहे.

Web Title: how many terrorists are present in jammu and kashmir know numbers of pakistani and local terrorists 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.