एकच कोंबडी किती वेळा हलाल करणार - मोदींवर नितिश कुमारांचा हल्ला
By admin | Published: August 18, 2015 05:56 PM2015-08-18T17:56:57+5:302015-08-18T18:28:29+5:30
आधीपासून अनेकवेळा प्रस्तावित असलेल्याच योजनाच पुन्हा पुन्हा रिपॅकेज करून सादर केल्या जात असून एकच कोंबडी किती वेळा हलाल करणार असा प्रश्न बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमारांनी यांनी
Next
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १८ - आधीपासून अनेकवेळा प्रस्तावित असलेल्याच योजनाच पुन्हा पुन्हा रिपॅकेज करून सादर केल्या जात असून एकच कोंबडी किती वेळा हलाल करणार असा प्रश्न बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी नरेंद्र मोदींना विचारला आहे. जसं लोकसभा निवडणुकीच्या आधी बोलायला काय जातं, द्यायचं थोडीच आहे? अशा प्रकारे भाषणं केली तोच प्रकार बिहारमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा करत असल्याचा आरोप नितिश कुमारांनी केला आहे.
मोठ- मोठ्या वल्गना मोदी करतात, परंतु या सगळ्या पॅकेजसाठी पैसा कुठून आणणार, त्यासाठी बजेटमध्ये का तरतूद केली आहे ते तरी सांगावं ना त्यांनी असा टोला नितिश कुमारांनी केला.
पूरग्रस्तांसाठी मदत देणं हे कर्तव्य सगळी राज्य पार पाडतात, परंतु ते कुणी बोलून दाखवत नाही. गुजरातने पाच कोटी रुपये दिले आणि असा दावा केला की या राज्यानेच सगळ्यात जास्त पैसे दिले. ही वस्तुस्थिती नसल्याचं सांगताना बिहारनेही अनेक राज्यांना आर्थिक सहाय्य केले असल्याचे सांगितले, तसेच देणारा बोलून दाखवत नसल्याचे नितिश कुमार म्हणाले.
नितिश कुमारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
- ज्या ज्या गोष्टी आधी प्रस्तावित केल्या आहेत, त्याच मोदींनी सादर केलेल्या पॅकेजमध्ये आहेत... हे सगळं अद्भुत आहे.
- विमानतळ बांधणार हे ऐकून ऐकून आम्ही थकलो आता. जी जमीन लागेल ती आमच्याकडे मागू नका, तिच्यासाठी लागमारा खर्चही करा.
- २०१३ मध्ये गॅस पाइपलाइनच्या योजना ठरल्या होत्या, ते पण या योजनेतच समाविष्ट केलंय... काय बोलणार आता?
- रस्त्यांवर आम्ही एक हजार कोटी रुपये खर्च केले, ते तरी द्या.
- नरेंद्र मोदी व नितिन गडकरी यांनी हजारो कोटींच्या नुसत्या घोषणा केल्या नी लाखोंच्या नोक-या निर्माण करण्याचं आश्वासन देतायत, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे... बिहारच्या नुसत्या बोली लावत आहेत, सध्याची बोली सव्वा लाख कोटी रुपयांची आहे.
- केंद्र सरकारला बिहारच्या विकासासाठी आम्ही सविस्तर रोडमॅप दिला होता, ब-यापैकी आम्ही कामही सुरू केलं, भरपूर पैसे खर्चही केले परंतु केंद्राकडून पैसेच येत नसल्याची टीका नितिश कुमारांनी केली.
- आधीपासून अस्तित्वात असलेल्या योजनाच पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाविष्ट केल्याचे सांगत एकही कोंबडी कितनी बार हलाल करोगे असं विचारत नितिश कुमारांनी मोदींची खिल्ली उडवली.
- हे बिहार आहे, गुजरात नाही... विसरू नका.
- बिहारमध्ये प्रत्येक क्षेत्रात काम करत असून त्यामध्ये सुधारणा होत आहे. वीज पुरवठ्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे, याबाबत बिहारच्या जनतेला सर्व ठावूक आहे.
- एकीकडे को-ऑपरेटिव्ह फेडरलीझमचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे राज्यांना याचकासारखी वागणूक द्यायची ही दुटप्पी वागणूक चुकीची आहे.
- केवळ आर्थिक पॅकेजवर आम्ही संतुष्ट नाही तर विशेष राज्याचा दर्जा बिहारला हवा आहे.
- बिहारमध्ये गैरभाजपाचं सरकार असलेलं पंतप्रधानांना सहन होत नाही आहे.
- बिहारच्या वाट्याचं जे आहे ते बिहारला मिळायलाच पाहिजे.
- विशेष पॅकेज हा आमचा हक्क आहे, उपकार नाही.
- पॅकेज दिले म्हणजे असे वाटले की मोदी बिहारची बोली लावत आहेत.