Petrol, Diesel Price: एक लीटर पेट्रोल, डिझेलमागे केंद्र सरकारला किती रुपये मिळतात? लोकसभेत मांडला हिशोब

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 05:37 PM2021-11-29T17:37:48+5:302021-11-29T17:39:06+5:30

Modi Governement Income from Petrol, Diesel Excise duty: नव्या कोरोना व्हेरिअंटमुळे कच्च्या तेलाचे दर झपाट्याने खाली आले आहेत. तरीही सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर तेच ठेवले आहेत.

How much income of the central government get for a liter of petrol and diesel taxes? answer given in Lok Sabha | Petrol, Diesel Price: एक लीटर पेट्रोल, डिझेलमागे केंद्र सरकारला किती रुपये मिळतात? लोकसभेत मांडला हिशोब

Petrol, Diesel Price: एक लीटर पेट्रोल, डिझेलमागे केंद्र सरकारला किती रुपये मिळतात? लोकसभेत मांडला हिशोब

googlenewsNext

पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे देशात महागाईचा काळ येऊ लागला आहे. कोथिंबिरीपासून ते टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्जपर्यंत सारे काही वाढलेले आहे. अशातच उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांच्या निवडणुका आणि दिवाळी असा मध्य साधत केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली होती. आता सरकारने पेट्रोल, डिझेलमागे केंद्र सरकारला किती रुपये मिळतात त्याची आकडेवारी दिली आहे. 

नव्या कोरोना व्हेरिअंटमुळे कच्च्या तेलाचे दर झपाट्याने खाली आले आहेत. तरीही सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर तेच ठेवले आहेत. गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल, डिझेलच्या दरात एक पैशाचाही बदल झालेला नाही. सरकारने कमी केलेला कर पुरेसा नाहीय. आजही पेट्रोल 100री पार आणि डिझेल 90 रुपयांच्या वर आहे. अनेक राज्यांनी त्यांच्या व्हॅटमध्ये कपात केली आहे. महाराष्ट्रात ही कपात झालेली नाही. 

या साऱ्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार (All India Trinamool Congress (AITC)) माला रॉय (Mala Roy) यांनी लोकसभेत आज पेट्रोल डिझेलवर सरकारला एक्साईज ड्युटीद्वारे किती कमाई होते, असा प्रश्न विचारला. यावर सरकारने उत्तर दिले आहे. 

अर्थ मंत्रालयाने यावर उत्तर देताना पेट्रोलच्या उत्पादन शुल्कामधून 27.90 रुपये प्रती लीटर आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातून 21.80 रुपये प्रति लीटर कर मिळतो, असे सांगितले. 

पेट्रोल 

  • एकूण 27.90 रुपये प्रति लीटर कमाई
  • मूळ उत्पादन शुल्क- 1.40 रुपये प्रति लीटर
  • विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क- 11 रुपये प्रति लीटर
  • अतिरिक्त उत्पादन शुल्क (रस्ते आणि पायाभूत उपकर)- 13 रुपये प्रति लीटर
  • कृषी उपकर – 2.50 रुपये प्रति लीटर

 

डिझेल 

  • 21.80 रुपये प्रति लिटर कमाई
  • मूळ उत्पादन शुल्क- 1.80 रुपये प्रति लीटर
  • विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क- 8 रुपये प्रति लीटर
  • अतिरिक्त उत्पादन शुल्क (रस्ते आणि पायाभूत उपकर)- 8 रुपये प्रति लीटर
  • कृषी उपकर – 4 रुपये प्रति लीटर

 

कोरोना काळात चार वेळा वाढ
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी कोरोना संकटाच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने सरकारने उत्पादन शुल्कात चारवेळा वाढ केली होती. पेट्रोलच्या दरात 13 रुपये आणि डिझेलमध्ये 16 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर 27.90 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 21.8 रुपये उत्पादन शुल्क आकारते.

Web Title: How much income of the central government get for a liter of petrol and diesel taxes? answer given in Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.