फ्री सेवेमुळे रिलायन्स जिओला किती तोटा झाला?

By admin | Published: April 25, 2017 06:31 AM2017-04-25T06:31:02+5:302017-04-25T08:00:32+5:30

मोफत सुविधा देऊन धमाका उडवून देणा-या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला याचा किती तोटा झाला असेल याबाबत अनेकदा चर्चा रंगल्या.

How much loss did Reliance Jio free service? | फ्री सेवेमुळे रिलायन्स जिओला किती तोटा झाला?

फ्री सेवेमुळे रिलायन्स जिओला किती तोटा झाला?

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - कोट्यवधी ग्राहकांना मोफत सुविधा देऊन धमाका उडवून देणा-या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओला याचा किती तोटा झाला असेल याबाबत अनेकदा चर्चा रंगल्या, अनेक तर्क-वितर्क काढले गेले. पण आता जिओ कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी गेल्या 6 महिन्यात जिओला 22.5 कोटी रूपयांचा शूद्ध तोटा झाल्याचं म्हटलं आहे.
 
ऑक्टोबर 2016 ते मार्च 2016 या कालावधीतील हे आकडे आहेत. या दरम्यान कंपनीने ग्राहकांकडून एकही रूपया घेतलेला नाही. याउलट कोट्यवधी ग्राहकांना मोफत कॉलिंग आणि इंटरनेटची सेवा कंपनीने पुरवली. 
 
सोमवारी कंपनीने 31 मार्चला संपलेल्या 6 महिन्यांच्या कालावधीची आकडेवारी शेअर बाजाराला दिली. यामध्ये 6 महिन्यात जिओला 22.5 कोटी रूपयांचा शूद्ध तोटा झाल्याचं सांगितलं गेलं तर गेल्या वर्षी याच कालावधीतील कंपनीचा शूद्ध तोटा 7.46 कोटी होता असं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये जिओने आपली सुविधा सुरू केली होती.
 
सप्टेंबरमध्ये सेवा सुरू झाल्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत जिओ वेलकम ऑफर दिली होती. त्यानंतर ‘हॅपी न्यू ईअर ऑफर’ या नावाने नवी सेवा ग्राहकांच्या सेवेत आणली. ही योजना पहिल्या योजनेसारखीच होती फक्त अमर्यादित डाटाऐवजी दररोज 1 जीबी मोफत डाटा  ग्राहकांना मिळत होता. 31 मार्चला ही सेवा संपल्यानंतर समर सरप्राइज ऑफर आणि आता धन धना धन ऑफर अशा सेवा जिओने आणल्या. यापैकी समर सरप्राइज ऑफरपासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून त्यांनी पैसे आकारण्यास सुरूवात केली आहे.  
 

Web Title: How much loss did Reliance Jio free service?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.