वक्फ बोर्डाची कोणत्या राज्यात किती आहे मालमत्ता? कोणत्या राज्यात सर्वाधिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:05 IST2025-04-03T18:04:09+5:302025-04-03T18:05:24+5:30

Waqf Board Property in India: सच्चर समितीने २००६ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. ज्यामध्ये असे म्हटले होते की, जर या मालमत्तांचा योग्य वापर केला गेला तर त्यांच्यापासून किमान १० टक्के महसूल मिळू शकेल, असे म्हटले गेले होते.

How much property does the Waqf Board have in which state? Which state has the most? | वक्फ बोर्डाची कोणत्या राज्यात किती आहे मालमत्ता? कोणत्या राज्यात सर्वाधिक?

वक्फ बोर्डाची कोणत्या राज्यात किती आहे मालमत्ता? कोणत्या राज्यात सर्वाधिक?

Waqf Board Property:वक्फ बोर्डाकडे भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी जमीन आहे. वक्फ बोर्डाचे सध्या ९.४ लाख एकरांवर पसरलेल्या ८.७लाख मालमत्तांवर नियंत्रण आहे. ज्यांचे अंदाजे मूल्य १.२ लाख कोटी रुपये आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सशस्त्र दल आणि भारतीय रेल्वेनंतर हे बोर्ड देशातील सर्वात मोठे जमीन मालक आहे. ८.७ लाख बोर्ड मालमत्तांपैकी ३,५६,०५१ वक्फ इस्टेट म्हणून नोंदणीकृत आहेत. ज्यामध्ये ८,७२,३२८ अचल आणि १६,७१३ चल संपत्ती आहे.

वाचा >> वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर रझा अकादमी आक्रमक, मुंबई घेतली बैठक

सच्चर समितीने २००६ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. ज्यामध्ये असे म्हटले होते की, जर या मालमत्तांचा योग्य वापर केला गेला तर त्यांच्यापासून किमान १० टक्के महसूल मिळू शकेल. जो दरवर्षी सुमारे १२,००० कोटी रुपये असू शकतो. समितीने वक्फ व्यवस्थापन सुधारण्यासाठी अनेक उपायांची शिफारसदेखील केली आहे.

जसे की केंद्रीय वक्फ बोर्ड आणि प्रत्येक राज्य वक्फ बोर्डात दोन महिला सदस्यांचा समावेश करणे. केंद्रीय आणि राज्य वक्फ बोर्डात संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी आणि वक्फला आर्थिक लेखापरीक्षणांतर्गत आणावे.

वक्फ बोर्डाची २७ टक्के मालमत्ता फक्त उत्तर प्रदेशात

भारतातील वक्फ बोर्डाची सर्वात मोठी जमीन उत्तर प्रदेशात आहे. जी एकूण वक्फ बोर्डाच्या अचल संपत्तीच्या २७ टक्के आहे. येथे एकूण २,३२,५४७ अचल संपत्ती आहे. 

यानंतर पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये ९ टक्के जमीन आहे. तामिळनाडूमध्ये ८ टक्के, केरळ, तेलंगणा आणि गुजरातमध्ये ५ टक्के जमीन आहे. कर्नाटकातील एकूण अचल संपत्ती ७ टक्के आहे.

Web Title: How much property does the Waqf Board have in which state? Which state has the most?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.