मोदी पाकिस्तानला कसे गेले, SPG नेही नकार दिलेला; खासदारांना सांगितला न ऐकलेला किस्सा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 05:05 PM2024-02-09T17:05:37+5:302024-02-09T17:06:22+5:30
Narendra Modi Pakistan Visit: मोदींनी स्वत: फोन करून या खासदारांना तुम्हाला शिक्षा करायचीय, असे सांगितले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तान दौऱ्याबाबतही खुलासा केला.
लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. देशभरातून ९७ कोटी मतदार मतदानास पात्र आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या कॅन्टीनमध्ये सर्वपक्षीय खासदारांसोबत जेवण केले. यावेळी भाजप, तेलगू देसम, बसपा, बीजद या पक्षांचे खासदार उपस्थित होते. मोदींसोबत जेवण करायचे असल्याची माहिती खासदारांना दुपारी २.३० वाजता देण्यात आली होती. यावेळी मोदी यांनी पहिल्या टर्मवेळचा पाकिस्तानात नवाझ शरीफ यांना भेटायला जाण्याचा किस्सा या खासदारांना सांगितला.
मोदींनी स्वत: फोन करून या खासदारांना तुम्हाला शिक्षा करायचीय, असे सांगितले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तान दौऱ्याबाबतही खुलासा केला.
खरेतर एका खासदारांनीच मोदींना तुम्ही अचानक पाकिस्तानला का गेलात असा सवाल विचारला. तेव्हा त्यांनी याचे उत्तर दिले. मोदी म्हणाले, मी दुपारी दोन वाजेपर्यंत संसदेतच होतो. यानंतर मी अफगाणिस्तानला रवाना झालो. येताना मी पाकिस्तानात थांबण्याचा निर्णय घेतला. तो एसपीजीला सांगितला. त्यांनी यास नकार दिला होता, असे मोदी म्हणाले.
एसजीपीच्या नकारानंतर मोदींनी थेट पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना फोन केला होता. त्यांच्या मुलीचे लग्न होते. तुम्ही मला रिसिव्ह करण्यासाठी येणार का, असे विचारले. शरीफ यांनी होकार दिला, यानंतर मी पाकिस्तानला गेलो, असे मोदी म्हणाले.