मुख्यमंत्र्यांचे गोडवे गाण्यासाठी अधिकाऱ्यांची तयारी; कार्यक्रमाआधी सामान्यांची शिकवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 03:57 PM2021-05-18T15:57:45+5:302021-05-18T16:02:18+5:30
मुख्यमंत्र्यांना सर्व काही ऑल इज वेल दिसावं यासाठी अधिकाऱ्यांच्या सर्वसामान्यांना सूचना
हाजीपूर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. अजूनही देशात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे सर्वच राज्यं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अनेक जिल्ह्यांची वर्च्युअल टूर करून तेथील स्थितीचा आढावा घेत आहेत. लोकांशी थेट संवाद साधून प्रत्यक्षात असलेल्या परिस्थितीची माहिती घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र यावर प्रशासनातील अधिकारी पाणी फिरवताना दिसत आहेत.
राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यामध्ये अधिकारी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करून सगळं ठीक आहे, हे कसं सांगायचं याची शिकवणी घेताना दिसत आहेत. मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हाजीपूरमधील सामुदायिक स्वयंपाकघराचा व्हर्च्युअल आढावा घेणार होते. त्या ठिकाणी सकाळपासूनच मोठी तयारी पाहायला मिळाली. बॅनर, पोस्टरसोबत स्वच्छतादेखील ठेवण्यात आली होती. कोणीही उपाशी राहू नये या उद्देशानं सामुदायिक स्वयंपाकघराची सुरुवात करण्यात आली.
माणुसकी! मुलगा कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये, वृद्ध मातेचा मृत्यू; डॉक्टरने केले अंत्यसंस्कार
मुख्यमंत्री सामुदायिक स्वयंपाकघराचा आढावा घेण्याआधी तिथला एक व्हिडीओ समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांना सगळं काही व्यवस्थित वाटावं, यासाठी अधिकाऱ्यांनी उपस्थित असलेल्यांना काय बोलायचं याबद्दलचे धडे दिले. मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणतीही तक्रार पोहोचू नये याची व्यवस्था अधिकाऱ्यांनी केली. मुख्यमंत्र्यांना काय सांगायचं, स्वत:चं म्हणणं कसं मांडायचं, सर्व ठीक आहे म्हणायचं, याचे धडे अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना दिले. अधिकाऱ्यांच्या या शिकवणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.