कसे उघडाल पीपीएफ अकाऊंट? काय आहेत याचे फायदे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 11:26 AM2018-04-07T11:26:57+5:302018-04-07T11:26:57+5:30
पीपीएफ अकाऊंटमध्ये गुंतवणूक आणि त्यातून मिळणा-या व्याजावर टॅक्समध्ये सूट मिळते. चला जाणून घेऊया पीपीएफ अकाऊंट आणि याचे नियम-फायदे....
काही दशकांपासून पब्लिक प्रॉविडंट फंड म्हणजेच पीपीएफ अकाऊंट अनेक गुंतवणुकदारांसाठी गुंतवणुकीचं साधन बनलं आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे पीपीएफ अकाऊंटमध्ये गुंतवणूक आणि त्यातून मिळणा-या व्याजावर टॅक्समध्ये सूट मिळते. चला जाणून घेऊया पीपीएफ अकाऊंट आणि याचे नियम-फायदे....
यासाठी पीपीएफ आकर्षक
पीपीएफ अकाऊंटमध्ये गुंतवणूक करण्यात आलेल्या रकमेवर इन्कम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या सेक्शन 80 सी नुसार टॅक्स डिडक्शन मिळतं. इतकेच नाहीतर यात गुंतवणूक केल्याने व्याजही मिळतं.
कमीत कमी 15 वर्ष गुंतवणूक
ही केंद्र सरकारची लांब कालावधीची गुंतवणूक योजना आहे. पीपीएफ 15 वर्षांची मॅंच्युरिटी असलेली स्कीम आहे. पीपीएफ अकाऊंटमध्ये एका वर्षांत जास्तीत जास्त 12 वेळा पैसे टाकता येतात.
किती आहे डिपॉझिट लिमीट?
अकाऊंट अॅक्टीव ठेवण्यासाठी वर्षाला कमीत कमी 500 रुपये अकाऊंटमध्ये टाकावे लागतील. तर एका आर्थिक वर्षात या अकाऊंटमध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये टाकता येतात. जर तुम्ही मुलाच्या नावावर आणि स्वत:च्या नावावर अशी दोन अकाऊंट काढले असेल तरीही वर्षाला केवळ 1.5 लाख रुपयेच तुम्ही जमा करु शकता.
लिमिटपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास काय?
जर तुम्ही 1.5 लाख रुपयांच्या वार्षिक सीमेपेक्षा जास्त रक्कम पीपीएफ अकाऊंटमध्ये जमा केली तर अतिरिक्त रकमेवर व्याज मिळणार नाही. आणि टॅक्स मधूनही सूट मिळणार नाही. ही रक्कम तुम्हाला व्याज न देता परत केली जाईल.
काय आहे पाच तारखेचा फंडा?
जर तुम्हाला पीपीएफ अकाऊंटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 5 तारीख महत्वाची आहे. 1 ते 5 तारखेदरम्यान तुम्हाला अकाऊंटमध्ये कोणत्याही परिस्थीतीत पैसे टाकावे लागतील.
व्याज दर किती?
पीपीएफ अकाऊंटमध्ये जमा असलेले पैसे इक्विटीजमध्ये लावले जात नाही, त्यामुळे रिटर्नच्या बाबतीत याची तुलना स्टॉक मार्केटसोबत केली जाऊ शकत नाही. 1986 ते 2000 दरम्यान व्याज दर 12 टक्के होता. पण आता यावर 7.6 टक्के व्याज दर लागू आहे.
एक व्यक्ती, एक अकाऊंट
तुम्ही एकच पीपीएफ अकाऊंट काढू शकता. जर एकाच नावावर दोन अकाऊंट असतील तर पहिलं अकाऊंट सोडून दुसरे अकाऊंट बंद केले जातील. त्यातील रक्कम तुम्हाला परत केली जाईल, पण व्याज दिलं जाणार नाही.
कसे उघडणार पीपीएफ अकाऊंट?
सरकारने काही पोस्ट ऑफिस आणि काही बॅंकांमध्ये पीपीएफ अकाऊंट उघडण्याचा अधिकार दिला आहे. काही बॅंका ऑनलाईन अकाऊंट उघडण्याचाही पर्याय देतात.
कधी करु शकता अकाऊंट बंद? लोनची सुविधा
तुम्ही पीपीएफ अकाऊंटवर लोनही घेऊ शकता आणि जमा रकमेतील काही भाग काढूही शकता. आता तर मॅच्योरिटीच्या आधीच पीपीएफ अकाऊंट बंद करण्याची सोय आहे. अकाऊंट उघडल्यानंतर कमीत कमी पाच वर्षात पूर्ण झाल्यानंतर काही खास म्हणजे खातेधारक, पत्नी, मुलं यांच्या गंभीर आजारांच्या उपचारासाठी आणि किंवा खातेधारकांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे काढता येऊ शकतात.