Coronavirus: तिसरी लाट आली हे कसे ओळखायचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 09:52 AM2021-07-19T09:52:59+5:302021-07-19T09:59:00+5:30
अलीकडेच इंडियन मेडिकल असोसिएशन, या देशातील सर्वोच्च वैद्यकीय संघटनेने ‘कोरोनाची तिसरी लाट अटळ’ असल्याचा इशारा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क : सिमला-कुलू मनाली तसेच इतर पर्यटन स्थळांवरची गर्दी पाहून अलीकडेच इंडियन मेडिकल असोसिएशन, या देशातील सर्वोच्च वैद्यकीय संघटनेने ‘कोरोनाची तिसरी लाट अटळ’ असल्याचा इशारा दिला. केंद्र सरकारही सातत्याने तिसऱ्या लाटेविषयी इशारे देत आहे. कोरोनाची ‘आर व्हॅल्यू’ तूर्तास ०.८८ एवढी असून ती १.० वर पोहोचताच तिसऱ्या लाटेवर शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबतही केंद्राने सर्व राज्यांना सतर्क केले आहे. जाणून घेऊ या ‘आर व्हॅल्यू’ काय आहे ते...
‘आर व्हॅल्यू’ म्हणजे काय, ती कशी मोजतात?
- डेटा सायन्सनुसार आर व्हॅल्यू म्हणजे कोरोना विषाणूचा रिप्रोडक्शन रेट म्हणजेच पुनरुत्पादन होण्याचा दर
- एक बाधित व्यक्ती किती जणांना बाधित करू शकते, हे ‘आर व्हॅल्यू’ सांगते. जर १.० बाधित आणखी १.० जणांना बाधित करत असतील तर ‘आर व्हॅल्यू’ १.० इतकी असते.
- जर १०० बाधित आणखी ८० जणांपर्यंत हा संसर्ग पोहचवत असतील तर ‘आर व्हॅल्यू’ ०.८० इतकी असेल.
चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसच्या (आयएमएससी) अभ्यासानुसार सध्या देशाचा सरासरी ‘आर व्हॅल्यू’ १.० पेक्षा कमी असली तरी काही राज्यांत ती झपाट्याने वाढत आहे.
‘आर व्हॅल्यू’ १.० पेक्षा अधिक होणे म्हणजे रुग्ण वाढू लागल्याचे संकेत आहेत. हे टाळण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर आदी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. - अजय भल्ला, केंद्रीय गृह सचिव
राज्यनिहाय ‘आर व्हॅल्यू’
अरुणाचल प्रदेश : १.१४
मणिपूर : १.०७
मेघालय : ०.९२
त्रिपुरा : १.१५
मिझोराम : ०.८६
सिक्कीम : ०.८८
आसाम : ०.८६
महाराष्ट्र : ३० मे रोजी
‘आर व्हॅल्यू’: ०.८४
जूनअखेरीस : ०.८९ झाली. या दरम्यान रुग्ण वाढले
केरळ ‘आर व्हॅल्यू’ : ०.८४
जुलैच्या सुरुवातीलाच ‘आर व्हॅल्यू’: १.१० इतकी.
रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे
१५ फेब्रुवारीनंतर ‘आर व्हॅल्यू’:
०.९३ वरून १.०२ वर रुग्ण वाढू लागल्याचे संकेत
९ मार्च ते २१ एप्रिलदरम्यान ‘आर व्हॅल्यू’:
१.३७ वर. या काळात रुग्णवाढ वेगाने
दुसरी लाट वाढ सर्वोच्च स्थानाच्या दिशेने
२४ एप्रिल ते १ मे दरम्यान ‘आर व्हॅल्यू’ :
१.१८ वर. रुग्ण कमी होऊ लागले
१ मे ते ७ मे दरम्यान ‘आर व्हॅल्यू’ :
१.१० वर. रुग्ण कमी होऊ लागले
१५ मे ते २६ मे दरम्यान ‘आर व्हॅल्यू’:
०.७८. रुग्णसंख्येचा आलेख झपाट्याने घसरू लागला
सद्य:स्थिती
२० जून ते ७ जुलै दरम्यान
‘आर व्हॅल्यू’: ०.८८