भारत कसा असावा? देशवासीयांना नेमके काय वाटते? PM नरेंद्र मोदींनी वाचून दाखवली यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 08:54 AM2024-08-15T08:54:52+5:302024-08-15T08:56:53+5:30

PM Narendra Modi Speech on 78th India Independence Day: विकसित भारताच्या संकल्पासाठी सरकारने नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या, असे सांगत देशवासीयांना नेमके काय वाटते, ते पंतप्रधान मोदींनी सांगितले.

how should india to be and what exactly do the countrymen think pm narendra modi read out the list on independence day 2024 speech | भारत कसा असावा? देशवासीयांना नेमके काय वाटते? PM नरेंद्र मोदींनी वाचून दाखवली यादी

भारत कसा असावा? देशवासीयांना नेमके काय वाटते? PM नरेंद्र मोदींनी वाचून दाखवली यादी

PM Narendra Modi Speech on 78th India Independence Day: संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून ११ व्यांदा तिरंगा फडकवला. ध्वजारोहण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. विकसित भारत, समृद्ध भारत, व्होकल फॉर लोकल यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच देशवासीयांना आपला भारत कसा असावा, याबाबत नेमके काय वाटते, याची एक यादीत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात वाचून दाखवली.

जागतिक विकासात भारताचे योगदान वाढले आहे. भारताची निर्यात सातत्याने वाढत आहे. परकीय चलनाचा साठा पूर्वीच्या तुलनेत दुप्पट होत चालला आहे. जागतिक संस्थांचा भारतावरील विश्वास वाढला आहे. भारत वेगाने प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होत आहे. शासन, प्रशासनाच्या प्रत्येक विभागात दोन सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. पंचायत स्तरावर असेच व्हायला हवे. असे केल्यास लाखो सुधारणा काही वेळातच घडतील. सामान्यांचे जीवन सुकर होईल. असे झाले तर आपल्या देशातील युवक नवीन उंची गाठतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. 

देशाची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे दिसते

जाती-पातीच्या वरती उठून प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवला जातो, तेव्हा देशाची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे दिसते. मध्यमवर्गीय कुटुंबांना उत्तम जीवन जगण्याची अपेक्षा असते. मी एक स्वप्न पाहिले आहे की, २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण झाला, तर त्याचा एक घटक असा असेल की, सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात हस्तक्षेप करू नये. सरकारची गरज भासल्यास अशी व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प केला जातो की, सरकारमुळे कोणताही त्रास, अडथळा निर्माण होऊ नयेत. परंतु सरकारची गरज भासल्यास प्रशासन समस्यांमध्ये मदतीला उपलब्ध असेल, असे मोदी म्हणाले.

दरम्यान, विकसित भारतासाठी सरकारने सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. हजारो देशवासीयांनी सल्ला, सूचना सरकारला पाठवल्या, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आणि काही यादी वाचून दाखवली.

भारत कसा असावा? देशवासीयांना नेमके काय वाटते? 

- भारत हे जगाचे स्किल कॅपिटल बनावे. 

- भारत जागतिक उत्पादन केंद्र बनायला हवे.  

- भारतीय विद्यापीठे जागतिक दर्जाची व्हायला हवीत. 

- भारतीय मीडिया जागतिक बनला पाहिजे 

- भारतातील कुशल युवक ही जगाची पहिली पसंती बनली पाहिजे. 

- भारताने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लवकरात लवकर स्वावलंबी व्हावे. 

- सुपरफूड्स जगातील प्रत्येक डायनिंग टेबलवर पोहोचवायला हवेत. जगाचे पोषित करून भारतातील शेतकऱ्याला समृद्ध केले पाहिजे. 

- छोटे विभागांचा कारभार आणि प्रशासन सुधारले पाहिजे. 

- न्याय मिळण्यास विलंब होत आहे, ही चिंताजनक आहे; आपल्या देशाच्या न्याय व्यवस्थेत सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. 

- वाढत्या नैसर्गिक संकटात प्रशासनासाठी मोहिमा राबवायला हव्यात. 

- अंतराळात भारताचे स्पेस स्टेशन असावे. 

- भारत पारंपारिक औषधे आणि समृद्ध आरोग्याचे केंद्र म्हणून विकसित व्हावा. 

- भारत लवकरात लवकर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनायला पाहिजे, अशा अनेक सूचना देशवासीयांनी दिल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

 

Web Title: how should india to be and what exactly do the countrymen think pm narendra modi read out the list on independence day 2024 speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.