"सुशांत कसा आहे?"... आत्महत्येच्या धक्क्यानं वहिनीनं सोडला प्राण, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 07:49 AM2020-06-16T07:49:03+5:302020-06-16T10:23:09+5:30
सुशांतने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात रविवारी रात्रीच तीन डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शवविच्छेदन केले.
पूर्णिया : मालिकांमधून महिलांच्या मनातील हिरो बनलेला बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घरावर दुसरा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुशांतचा मृत्यू देशभरातील महिलांच्या मनाला चटका लावून गेला. तसेच सुशांतच्या वहिनीलाही सुशांतच्या आत्महत्येचा मोठा धक्का बसला होता. हा धक्का ती पचवू शकली नाही.
सोमवारी मुंबईमध्ये सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा धक्का पचवत नाहीत तोच घरातील आणखी एक सदस्याने प्राण सोडले. जेव्हा सुशांतवर अंत्यसंस्कार होत होते, तेव्हा बिहारमध्ये राहणाऱ्या त्याच्या भावाची बायको सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्याने बेशुद्ध झाली होती. सुशांतचा मृत्यू झाल्याचे कळताच तिने अन्न पाणी सोडले होते.
सुशांतच्या चुलत भावाची पत्नी सुधा देवी ही सुशांतच्या मूळ गावी पूर्णियाच्या मलडीहा येथे राहत होती. सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकताच तिची तब्येत बिघडली होती. तिने अन्न पाणी सोडले होते. सुशांतच्या मृत्यूचा मोठा धक्का तिच्या मनावर बसला होता. एकीकडे सुशांतवर अंतिम संस्कार केले जात होते, दुसरीकडे सुधा देवी हीने प्राण सोडले होते.
सुधा देवी काही काळापासून आजारी होती. मात्र, सुशांतच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिची तब्येत आणखी बिघडली. धक्क्यामुळे ती वारंवार बेशुद्ध होत होती. तिच्या पतीने डॉक्टरांनाही बोलावले होते. मात्र, औषधांचा तिच्यावर काहीच फरक जाणवला नाही. जेव्हा ती शुद्धीवर यायची तेव्हा केवळ सुशांत कसा आहे? एवढेच विचारत होती. परत घरासमोरील गर्दी पाहून ती बेशुद्ध होत होती.
सुधा देवीचा पती आणि सुशांतचा चुलत भाऊ अमरेंद्र सिंग याने सांगितले की, सोमवारी सकाळी सुधा देवीची तब्येत बिघडली. सायंकाळी पाच वाजता तिने शेवटचा श्वास घेतला. आधी भाऊ सोडून गेला, आता पत्नी, कोणासाठी जिवंत राहू, असे दु:ख त्यांनी व्यक्त केले.
सुशांतची आत्महत्या
सुशांतने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात रविवारी रात्रीच तीन डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शवविच्छेदन केले. सोमवारी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून त्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली. आत्महत्येपूर्वी त्याने कुठलेही व्यसन केले नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. त्याच्या बँक खात्यातील तपशिलानुसार त्याला आर्थिक अडचण नसल्याचेही पोलिसांच्या माहितीत समोर आले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा
TikTok ची कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?; व्हिडीओ अॅप बंद करणार
भविष्यवाणी! भारतावर मोठे संकट; 4.4 डिग्रीने पारा चढणार
जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक