रोजंदारी मजूर ते IAS अधिकारी; संकटं आली पण 'त्याने' हार नाही मानली, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 11:09 AM2023-08-12T11:09:27+5:302023-08-12T11:18:34+5:30

रोजंदारी मजूर म्हणून काम करून आणि दगड फोडून पैसे कमवणारा तरुण आता आयएएस अधिकारी झाला आहे. राज भजन असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

how to become ias officer from daily wage laborer know success story of ram bhajan | रोजंदारी मजूर ते IAS अधिकारी; संकटं आली पण 'त्याने' हार नाही मानली, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

रोजंदारी मजूर ते IAS अधिकारी; संकटं आली पण 'त्याने' हार नाही मानली, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

googlenewsNext

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक सक्सेस स्टोरी आता समोर आली आहे. एकेकाळी रोजंदारी मजूर म्हणून काम करून आणि दगड फोडून पैसे कमवणारा तरुण आता आयएएस अधिकारी झाला आहे. राज भजन असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. 

राम भजन राजस्थानमधील बापी नावाच्या एका छोट्या गावातील रहिवासी आहे. गरीब असल्याने त्याच्याकडे राहण्यासाठी घरही नव्हतं. राम भजनबद्दल असं म्हणता येईल की जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो. रामने काहीतरी करण्याची इच्छा आणि कठोर परिश्रम केले आणि यूपीएससी परीक्षेत 667 वा रँक मिळवून घवघवीत यश संपादन केलं. आता तो आयएएस अधिकारी आहे.

राम भजनची गोष्ट प्रेरणादायी आहे. आता तो सरकारी अधिकारी असला तरी UPSC टॉपर राम भजनने गरिबी खूप जवळून पाहिली आहे, गरिबीने ग्रासलेल्या गावात रोजंदारी मजूर म्हणून जीवन व्यतीत केलं आहे. स्वप्न पाहणं सोडलं नाही आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले.

काही वर्षापूर्वी तो आईसोबत रोजंदारी मजूर म्हणून काम करत असे. राम भजनला दररोज अनेक तास दगड फोडण्याचं काम सोपवलं गेलं, तर त्याची आई रोज वजन उचलायची. UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या रामला दररोज सुमारे 25 कार्टन दगड पोहोचवण्याचे काम देण्यात आलं होतं. दिवसाच्या शेवटी, राम भजन फक्त 5 ते 10 रुपये कमवू शकत होता. एक वेळचे जेवण देखील मिळत नव्हतं.

आयएएस अधिकारी राम भजनने सुरुवातीच्या काळात खूप अडचणींचा सामना केला. गरीब कुटुंबातील असल्याने व घरावर आर्थिक संकट असल्याने ते स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरी पाळलेल्या शेळ्यांचे दूध विकून पैसे कमवत होते. कोरोना दरम्यान रामच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्याने आईसोबत मेहनत करून आपला उदरनिर्वाह सुरू केला. मात्र कठोर अभ्यास करून दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबलची नोकरी मिळवली.

अनेक वर्षे दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल राहिल्यानंतर राम भजनने शिक्षण सुरू ठेवत 2014 मध्ये UPSC परीक्षा दिली. राम भजन परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही, त्यानंतर त्याने पुन्हा प्रयत्न केला पण तो पुन्हा नापास झाला. हार न मानण्याची जिद्द मनात ठेवून राम भजन सतत प्रयत्न करत होता. 2022 मध्ये रामला यश मिळालं आणि तो अधिकारी झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: how to become ias officer from daily wage laborer know success story of ram bhajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.