अमेरिकी व्हिसाची प्रतीक्षा कशी कमी हाेणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 07:28 AM2023-02-20T07:28:54+5:302023-02-20T07:29:08+5:30
२०२३ च्या उन्हाळ्यापर्यंत संपूर्ण कर्मचारी वर्ग कार्यान्वित होईल. व्हिसा प्रतीक्षा कमी करण्यासाठी २१ जानेवारी रोजी यू. एस. मिशन इन इंडिया अंतर्गत पहिल्यांदा शनिवारी विशेष मुलाखतींच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली
प्रश्न - व्हिसासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी अमेरिकेतील यू. एस. काउन्सलेट काय करत आहे?
उत्तर : भारतीय पर्यटक आणि व्यवसायाच्या (बी १/बी २) व्हिसा अर्जदारांचा वेळ कमी करण्यासाठी अमेरिकेने विशिष्ट उद्दिष्ट निश्चित केले आहे. याकरिता एम्बसी आणि काउन्सलेटने अलीकडेच एक मोठे पाऊल उचलले असून संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदाच बी १ / बी २ व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या अडीच लाख अर्जदारांना व्हिसा मुलाखतीची वेळ जारी केली आहे. आमच्या संसाधनांच्या उपलब्धीनुसार मुलाखतीच्या वेळा जारी केल्या जातील आणि अन्य ठिकाणी असलेला डझनभर काउन्सलेटचा कर्मचारी वर्ग आम्ही मुंबईत सहकार्यासाठी पाठवला आहे. याचसोबत, डिपार्टमेंट ऑफ स्टेटने एम्बसी आणि काउन्सलेटमध्ये वाढीव कौन्सुल अधिकाऱ्यांची कायमची नेमणूक सुरू केली आहे.
२०२३ च्या उन्हाळ्यापर्यंत संपूर्ण कर्मचारी वर्ग कार्यान्वित होईल. व्हिसा प्रतीक्षा कमी करण्यासाठी २१ जानेवारी रोजी यू. एस. मिशन इन इंडिया अंतर्गत पहिल्यांदा शनिवारी विशेष मुलाखतींच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली. ज्यांना व्हिसासाठी प्रत्यक्ष मुलाखत द्यायची आहे, त्यांच्याकरिता अमेरिकेच्या नवी दिल्ली येथील एम्बसी आणि मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद येथील काउन्सलेटमध्ये शनिवारचे कामकाज सुरू केले आहे. आगामी महिन्यात मुलाखतींसाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध करून देण्यासाठी निवडक शनिवारी कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे. व्हिसाच्या प्रत्येक श्रेणीमध्ये मुलाखतीसाठी लागणारा प्रतीक्षा वेळ आता महामारीच्या अगोदरच्या काळाइतका किंवा त्यापेक्षा कमी झालेला आहे.
मुलाखतीतून सूट, ‘ड्रॉप बॉक्स’च्या माध्यमातून पर्यटन / व्यावसायिक व्हिसाच्या नूतनीकरणाची तसेच पहिल्यांदाच व्हिसासाठी अर्ज करणारे कर्मचारी, विद्यार्थी, कामगार (क्रू), एक्स्चेंज व्हिसिटर व्हिसा यांची प्रकरणे तुलनेने कमी झालेली आहेत. उदाहरणार्थ, क्रू मेंबरच्या मुलाखतीतून सूट मिळण्यासाठी (सी १ / डी) व्हिसासाठी सध्या प्रतीक्षा करावी लागत नाही. या व्हिसा श्रेणीतील प्रतीक्षा कमी करण्यात सातत्य राखण्यासाठी आम्ही शिपिंग, एअरलाईन आणि संबंधित कंपन्यांशी नित्याने संपर्कात आहोत. इमिग्रंट व्हिसा प्रोसेस करण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. आमची एम्बसी आणि भारतातील कौन्सुलेटने २०२२ या वर्षामध्ये २०१९ च्या महामारीपेक्षा जास्त व्हिसा जारी केले आहेत.
महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर अनुशेष निर्माण होण्याचे आव्हान उभे ठाकले असले तरी आम्ही भारतीय अर्जदारांची प्रतीक्षा कमी करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि अधिक सक्षमतेने व त्वरेने हे काम करतानाच आमची राष्ट्रीय जबाबदारी पार पाडत आहोत.