'आधार कार्ड'वरचा तुमचा फोटो खूप वाईट दिसतोय? बदलायचा आहे...मग आजच असा करा अपडेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 07:21 PM2023-04-06T19:21:47+5:302023-04-06T19:22:25+5:30
Update Aadhaar Card Photo: आधार कार्ड हे भारत सरकारनं नागरिकांना दिलेले महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. यामध्ये व्यक्तीचा लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक डेटा असतो.
Update Aadhaar Card Photo: आधार कार्ड हे भारत सरकारनं नागरिकांना दिलेले महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. यामध्ये व्यक्तीचा लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक डेटा असतो. नाव, पत्ता, जन्मतारीख/वय, लिंग, मोबाइल नंबर आणि ईमेल पत्ता यासारखी लोकसंख्याविषयक माहिती ऑनलाइन अपडेट केली जाऊ शकते परंतु बायोमेट्रिक माहिती जसे की रेटिनल स्कॅन, फिंगरप्रिंट आणि फोटो केवळ आधार नोंदणी केंद्रांवर अपडेट केलं जाऊ शकतात.
आधार कार्डवरील फोटोवर लोकांचा मोठा आक्षेप असतो. लहानपणीचा फोटो तुम्ही मोठे होईपर्यंत आधार कार्डवर तसाच असतो. अशा परिस्थितीत अनेकांना तो बदलावासा वाटतो. मग आधारवर छापलेला तुमचा फोटो तुम्हाला आवडत नसेल आणि तुम्हाला तो बदलायचा असेल, तर त्यासाठीही एक प्रक्रिया आहे.
आधार कार्डमधील फोटो असा अपडेट करा:
- सर्व प्रथम, आधार अपडेट फॉर्म भरा, जो UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो किंवा कोणत्याही आधार नोंदणी केंद्रावर सहज उपलब्ध आहे.
- फॉर्मसह आधार केंद्रावर जा. तो सबमिट करा आणि फिंगरप्रिंट, आयरीस कॅप्चर यासारखे बायोमेट्रिक तपशील द्या.
- तुमचा फोटो थेट कॅप्चर केला जाईल. या अपडेटसाठी तुम्हाला १०० रुपये शुल्क भरावे लागेल. त्यानंतर अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) ची पावती तयार होईल. यास ९० दिवस लागू शकतात.
- आधार डेटा अपडेट झाल्यानंतर, तुम्ही UIDAI वेबसाइटवरून ई-आधार किंवा आधार कार्डची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकता.