फेसबुकचे त्रासदायक नोटिफिकेशन कसे बंद करावे? वाचा...
By admin | Published: January 12, 2017 05:43 PM2017-01-12T17:43:33+5:302017-01-12T17:43:33+5:30
नोटिफिकेशनद्वारे फेसबुक आपल्याला वेगवेगळी माहिती पुरवत असतं.हे नोटीफीकेशन्स काही वेळानंतर आपल्याला त्रासदायक वाटायला लागतात. त्यामुळे एकाग्रतेने कोणतंच काम नीट करता येत नाही.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - सोशल नेटवर्कसाठी जगप्रसिद्ध असलेलं फेसबुक सध्या बहुतांश लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. नोटिफिकेशनद्वारे फेसबुक आपल्याला वेगवेगळी माहिती पुरवत असतं. वाढदिवस, लाइव्ह व्हिडीओ आदी नोटीफिकेशन फेसबुककडून वारंवार येत असतात.
हे नोटीफीकेशन्स काही वेळानंतर आपल्याला त्रासदायक वाटायला लागतात. त्यामुळे आपला पुर्ण वेळ मोबाईल पाहण्यात जातो आणि एकाग्रतेने कोणतंच काम नीट करता येत नाही. यापैकी काही नोटिफिकेशन्स आवश्यक असतात आणि काही फारसे गरजेचे नसतात. तर असे आपल्याला आवश्यक नसलेले नोटिफिकेशन्स बंद कसे करता येतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जर तुम्ही अॅन्ड्रॉईडवर फेसबुक अॅप वापरत असाल तर...
-अॅन्ड्रॉईडवर फेसबुक अॅप नोटिफिकेशनला डिसेबल करण्यासाठी या स्टेप फॉलो करा
-फेसबुक अॅप ओपन करा
-सर्वात वरती तुम्हाला तीन आडव्या रेषांचा आयकॉन दिसेल त्यावर टॅप करा
-त्यानंतर अकाउंट सेटिंगमध्ये जा
-आता नोटिफिकेशनवर टॅप करा आणि जे नोटिफिेकेशऩ नको असतील ते डिसेबल करा
जर तुम्ही iPhone किंवा iPad वर फेसबुक अॅप वापरत असाल तर....
-फेसबुक अॅप ओपन करा
-उजव्या बाजुला खाली तुम्हाला 'मोअर' (MORE) बटनवर टॅप करा
-त्यानंतर सेटिंगवर टॅप करून अकाउंट सेटिंगमध्ये जा
-नोटिफिकेशनवर टॅप करा. याठिकाणी तुम्ही बर्थडे रिमाइंडर आणि लाइव्ह व्हिडीओसारख्या नोटिफिकेशनच्या त्रासापासून सुटका करून घेऊ शकता.
कंम्प्युटरवर फेसबुक नोटिफिकेशन डिसेबल करण्यासाठी
-अॅप किंवा गेम्सच्या नोटिफिकेशनपासून सुटका करून घेण्यासाठी फेसबुक अॅप्लिकेशन सेटिंगमध्ये जा.
-त्यानंतर गेम आणि अॅप नोटिफिकेशनमध्ये जा आणि एडिटवर क्लिक करा
-त्यानंतर नोटिफिकेशन टर्न ऑफवर क्लिक करा
जर कोणी सातत्याने तुम्हाला अॅप इन्विटेशन पाठवत असेल तर ब्लॉकिंग सेटिंग पेजवर जा आणि ब्लॉक अॅप इन्व्हाइटमध्ये त्याचं नाव टाइप करा. याशिवाय बर्थडे रिमाइंडर सारखे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी फेसबुकच्या नोटिफिकेशन सेटिंग पेजवर जा.
बर्थडेजवळ असलेल्या बटनावर क्लिक करा आणि परत क्लिक ऑफ करा. याद्वारे फेसबुकवर मिळणारे बर्थडे नोटिफिकेशन डिसेबल होतील. यानंतरही तुम्हाला न्यूज फीड पेजवर बर्थडे रिमाइंडर दिसेल मात्र, यासाठी तुम्हाला कोणतंही नोटिफिकेशन येणार नाही. सेटिंग पेजवर जाऊन तुम्ही 'अदर टाइप ऑफ नोटिफिकेशन' जवळ असलेल्या बटनावर क्लिक करून ते बंद करू शकतात.
अशाप्रकारे तुम्ही फेसबुकवर त्रास देणारे सर्व नोटिफिकेशन बंद करू शकतात.