हल्ला घडविणारेच हल्ल्याची निंदा कशी करतील ? राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2017 12:35 PM2017-08-05T12:35:44+5:302017-08-05T12:39:48+5:30
हल्ल्याच्या मागे भाजपा असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे
अहमदाबाद, दि. 5- गुजरातमधील बनासकांठामध्ये पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मागे भाजपा असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी दगडफेकीच्या या घटनेवरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर शनिवारी प्रतिक्रिया दिली. माझ्यावर हल्ला करणारे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते आणि त्यांची व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकारण करण्याची हीच पद्धत आहे, त्यावर काय बोलू शकतो?असा थेट आरोप राहुल यांनी केला. या, संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिलेली नाही. हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर राहुल गांधी म्हणाले, ज्यांनी हा हल्ला घडवून आणला, ते स्वतः याची निंदा कशी करतील.
{{{{twitter_post_id####
Kal ki ghatna mein itna bada patthar BJP ke worker ne meri or maara, mere PSO ko laga: Rahul Gandhi on attack on his convoy in Gujarat pic.twitter.com/5Hnvh7KLBt
— ANI (@ANI_news) August 5, 2017
राहुल गांधी गुजरातमधील पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना शुक्रवारी बनासकांठा जिल्ह्यातील धानेरा येथे त्यांच्या ताफ्याला जमावाने लक्ष्य केलं होतं. राहुल गांधी यांच्या कारवर भलामोठा दगड भिरकावण्यात आला होता. त्यामुळे राहुल यांच्या कारची काच फुटून त्यात सुरक्षा अधिकारी जखमी झाला. त्यानंतर हा हल्ला भाजपच्या गुडांनी केला असा आरोप काँग्रेस नेते रणदीप सूरजेवाला यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना शनिवारी पत्रकारांनी हल्ल्याबाबत विचारलं. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर यावेळी राहुल गांधी यांनी थेट आरोप केले. या हल्ल्यामागे भाजपा असल्याचं थेट राहुल गांधी म्हणाले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्याने मारलेला दगड माझ्या सुरक्षा अधिकाऱ्याला लागला. हीच मोदी आणि भाजप-आरएसएसच्या राजकारणाची पद्धत आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी सडकून टीका केली आहे.
}}}}Modi ji aur BJP-RSS ka rajneeti ka tareeka hai, kya keh sakte hain?: Congress Vice President Rahul Gandhi on attack on his convoy in Gujarat pic.twitter.com/YAF0grcvOx
— ANI (@ANI_news) August 5, 2017
नेमकं प्रकरण काय ?
गुजरात दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या गाडीवर धनेरा येथील लाल चौकात हा हल्ला करण्यात आला . काँग्रेसने या हल्ल्यामागे भाजपा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला आहे. भाजपाने मात्र हे आरोप फेटाळून लावत काँग्रेसला आमच्यावर आरोरप करायची सवय झाली आहे असं म्हटलं आहे.
बनासकाठामध्ये राहुल गांधी म्हणाले, मी तुम्हा सर्वांमध्ये येऊ इच्छितो, काँग्रेस पक्ष हा तुमच्यासोबत आहे. मी पूरग्रस्तांच्या सोबत आहे. तत्पूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांशी बातचीत केली होती. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती उद्भवली आहे. मोठ्या संख्येनं लोक पुरात अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम काम करतेय. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा गुजरातच्या पूरग्रस्त स्थितीची पाहणी केली होती.