लष्करात महिलांची भूमिका कशी वाढेल?
By admin | Published: October 23, 2015 03:40 AM2015-10-23T03:40:45+5:302015-10-23T03:40:45+5:30
सैन्यदलात महिलांची भूमिका वाढू शकते काय? त्यांच्यावर काय जबाबदारी दिली जाऊ शकते? याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांकडून
नवी दिल्ली : सैन्यदलात महिलांची भूमिका वाढू शकते काय? त्यांच्यावर काय जबाबदारी दिली जाऊ शकते? याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांकडून माहिती मागविली आहे.
सैन्यदलात व्यापक परिवर्तन करण्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी ही माहिती मागविली आहे. तिन्ही दलांच्या प्रमुखांशी पर्रीकर यांनी या विषयावर नुकतीच चर्चा केली. याबाबत विस्तृत अहवाल देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राह यांनी लढाऊ विमानांसाठी महिलांची भरती करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सैन्यदलात महिलांवर अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
नेव्ही चीफ अॅडमिरल आर. के. धवन यांनीही सैन्य दलात महिलांची पायलट म्हणून भरती करण्याबाबत विचार होऊ शकतो, असे स्पष्ट केलेले आहे. दहशतवादविरोधी लढ्यात महिलांच्या सहभागाबाबत विचार करताना पर्रीकर म्हणाले की, महिला यात सहभागी होऊ शकतात, तथापि, अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल.
(लोकमत न्यूज नेटवर्क)